शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

यात्रेसाठी उकळले लाखो रुपये

By admin | Published: May 17, 2016 3:44 AM

एजंटने लाखो रुपये उकळल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कल्याण : उमरा यात्रेसाठी कल्याणमधील मुस्लिमांकडून जावेद हबीब (रा. ठाणे) या एजंटने लाखो रुपये उकळल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.पश्चिमेतील मुस्लिम वस्तीत राहणाऱ्या रजिया शेख या कोंथिबीर, कढीपत्ता विकतात. तर, त्यांचे पती मौला हेदेखील मोलमजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करीत आहेत. रजिया यांच्या घरी कर्नाटकहून त्यांची नणंद जुबेदा गौसव, त्यांचे पती अब्दुल गौस आले होते. उमरा या धार्मिक यात्रेला जाण्याचा आग्रह त्यांनी रजिया यांच्याकडे धरला. त्यामुळे त्यांनी पोटाला चिमटा काढून काही पैसे साठवले होते. जुबेदा, अब्दुल, सासू जुलेखा व मौला यांच्या तिकिटांची व्यवस्था केली. त्यासाठी त्यांनी हबीब याच्याकडे पाच जणांचे २ लाख ४५ हजार रुपये ११ महिन्यांपूर्वी भरले होते. रजिया यांच्याप्रमाणेच साबण विकणारे सलीम मेमन यांनीही हबीब यांच्याकडे ११ महिन्यांपूर्वी उमरा यात्रेसाठी मुलगा तरबेज आणि पत्नी जुलेखा यांचे एक लाख ९० हजार रुपये भरले होते. चार घरची धुणीभांडी करून पैसे गोळा करणाऱ्या वृद्ध महिला हलिमा हाजी कच्छी यांनीही पैसे जमवून उमरा यात्रेची मनीषा बाळगली होती. त्यासाठी त्यांनी ४५ हजार रुपये हबीब याच्याकडे भरले होते. मुंबईतील डोंगरी परिसरात राहणारे मुसा पडाया, त्यांचा मुलगा साबीर आणि मोहम्मद यांच्या तिकिटांसाठी एक लाख ३५ हजार रुपये हबीबकडे भरले होते. या सगळ्यांची फसवणूक करून हबीब पसार झाला आहे. कल्याणप्रमाणेच त्याने मुंब्रा, ठाणे परिसरातील उमरा यात्रेकरूंना गंडा घातल्याचे सांगण्यात येत आहे.हबीबने या सगळ्यांना बोगस विमान तिकिटे दिली होती. एका ए-फोर साइजच्या कोऱ्या कागदावर तिकिटाची डुप्लिकेट प्रिंट काढून दिली होती. प्रत्यक्षात त्याने त्यांचे तिकीट काढलेले नव्हते. १३ मे रोजी सांताक्रूझ विमानतळावरून उमराला जाण्यासाठी विमान असेल, असे हबीबने सांगितले होते. त्यासाठी ११ मे रोजी मेमन यांनी त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने १२ वाजता दुपारी देतो, असे सांगितले. १२ मेपासून हबीबचा फोन लागत नाही. तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असून हा नंबरच उपलब्ध नसल्याची संगणकीय टेप ऐकायला मिळत आहे. फसवणूक झालेल्या मंडळींनी हबीबच्या ठाण्यातील घरी मोर्चा वळवला. तेव्हा त्याच्या पत्नीने माझे पती दोन दिवसांपासून घरीच आलेले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांचा शोध घेत आहोत, असे सांगितले. (प्रतिनिधी)