- लक्ष्मण मोरे
पुणे : वित्तीय संस्थांच्या आमिषाला बळी पडून आयुष्याची पुंजी त्यांच्या स्वाधीन केलेल्या राज्यातील गुंतवणूकदारांना तब्बल १८ हजार ५६० कोटी ९६ लाख रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. सीआयडी या प्रकरणांचा तपास करत आहे.
नोंदणी झालेल्या कंपन्या, सहकारी कायद्याखालील पतसंस्था, मल्टिलेव्हल मार्केटिंग संस्था, शिक्षणसंस्था, घरासाठी कर्ज देणाऱ्या संस्था, नोकरी देणाºया संस्था, शेअर्स आणि अन्य अशा संस्थांनी केलेल्या फसवणुकीची सीआयडीने वर्गीकरण केले आहे. या संस्थांच्या आमिषाला ग्राहक भुलतात. आपली आयुष्यभराची कमाई या भुलाव्याला बळी पडून गुंतवून बसतात.
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. समृद्ध जीवन आणि भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थांसारख्या (बीएचआर) संस्थांनी ग्राहकांची शेकडो कोटींची फसवणूक केली आहे. समृद्ध जीवनच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, त्यांचा तपास सीआयडी व सीबीआय करीत आहे. बीएचआरविरुद्ध ४७ हजार ६०० ठेवीदारांनी जबाब दिले असून, आतापर्यंत १७३ कोटी ३९ लाख ३९ हजारांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मोठा परतावा व अधिक व्याजाच्या बहाण्याने पतसंस्था व मल्टीलेव्हल मार्केटींग कंपन्यांनी गेल्या तीन वर्षात तब्बल १६० कोटी ८४ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.१0२ कोटीच आतापर्यंत झाले हस्तगततपासाच वेग मात्र अतिशय मंदावलेला आहे. २०,३९४ गुन्ह्यांपैकी १३,२१३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.फसवणूक झालेल्या १८ हजार ५६० कोटी ९४ लाख रुपयांपैकी अवघी १०२ कोटी २७ लाख ५५ हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.त्यामुळे तपासाची एकंदरीत स्थिती लक्षात येते. यातील बहुतांश गुन्हे स्थानिक पातळीवरील आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा अथवा पोलीस ठाणे स्तरावर केला जातो.