मुंबई : तोटय़ातील एसटीला बाहेर काढण्याचे ज्ञान कर्मचारी आणि कामगारवर्गाला देणा:या महामंडळाने एसटीत नव्याने रुजू होणा:या अधिका:यांच्या उधळपट्टीकडे मात्र दुर्लक्षच केले आहे. एसटी महामंडळात वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारीपदाच्या जागेवर नुकतेच एक वरिष्ठ अधिकारी रुजू झाले असून, या अधिका:याने ‘वास्तुशास्त्र’चा हट्ट धरत आपल्या केबिन सजावटीवर लाखोंची उधळपट्टी केली आहे. सध्या त्यांचा वास्तुशास्त्रचा हट्ट एसटीत चर्चेचा विषय बनला आहे. नव्याने रुजू होणा:या अधिका:यांकडून एसटीच्या पैशांतून स्वत:च्या केबिनवर उधळपट्टी केल्याची ही पहिलीच घटना नसल्याचेही सांगण्यात येते.
एसटी महामंडळ सध्या मोठय़ा आर्थिक संकटात आहे. त्यामुळे हे आर्थिक संकट कसे कमी करता येईल, यासाठी महामंडळ प्रयत्न करीत आहे. तसेच एसटी कर्मचारी, चालक-वाहकांना उत्पन्नवाढीसाठी धडेही दिले जात आहेत. त्याची जाणीव प्रत्येकाला करून दिली जात असतानाही एसटीत नव्याने येणा:या अधिका:यांना मात्र आर्थिक परिस्थितीचे काही घेणो-देणोच नसल्याचे दिसून आले आहे. नव्याने येणारे वरिष्ठ अधिकारी रुजू होताच आपल्या केबिनवर पैशांची उधळपट्टी करण्यात गुंतले आहेत. एसटीच्या वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखा अधिकारीपदावर यापूर्वी रवींद्र धोंगडे कार्यरत होते. धोंगडे हे जून महिन्यात निवृत्त झाले. धोंगडे निवृत्त होताच जुलै महिन्यात याच पदावर एकनाथ मोरे रुजू झाले. मात्र, वास्तुशास्त्रची आवड असलेल्या मोरे यांनी रुजू होताच यापूर्वी धोंगडे बसत असलेल्या केबिनचा चेहरामोहराच बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्याला एसटी महामंडळाने संमतीही दिली. संपूर्ण केबिनला आतील बाजूस प्लायवूड बसवतानाच छताला वेगळ्या त:हेची विद्युत रोशणाई केली. त्याचप्रमाणो धोंगडे बसत असलेली दिशा
चुकीची असल्याने नव्याने आलेल्या मोरे यांनी आपली बसण्याची जागाही बदलली.
अंतर्गत सजावटीवर भर देताना एसटीकडून त्यांच्या केबिनवर लाखोंची उधळपट्टी करण्यात आली. त्यांच्या केबिनवर जवळपास 1 लाख 21 हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले. याबाबत, वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखा अधिकारी एकनाथ मोरे यांना विचारले असता वास्तुशास्त्रची आवड असल्यामुळेच हे नूतनीकरण केल्याचे सांगितले. हा वैयक्तिक प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
विशेष पोलीस महानिरीक्षक व एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी असलेले के.एल. बिष्णोई यांनीही काही महिन्यांपूर्वी आपला कारभार सांभाळताच केबिन सजावटीवर भर देण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल 75 हजार 8क्क् रुपये अंतर्गत सजावटीवर खर्च करण्यात आला.
2007 ते 2010 या काळात एसटी व्यवस्थापकीय संचालकपदावर ओ.पी. गुप्ता, त्यानंतर 2010 ते 2013 या काळात दीपक कपूर, सप्टेंबर 2013 ते मार्च 2014र्पयत विकास खारगे तर संजय खंदारे पदावर असून, आयएएस दर्जाच्या या अधिका:यांनी कुठल्याही प्रकारे केबिनच्या सजावटीवर भर दिलेला नाही.