शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अलंकापुरीत लाखो वैष्णव भाविकांच्या नाम जयघोषात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 15:13 IST

श्री विठ्ठल ,ज्ञानोबा माउली, ज्ञानोबा माउली, तुकाराम असा हरिनामजयघोष , वीणा,टाळ-मृदंगाचा गजरात प्रस्थान झाले.

ठळक मुद्देमहाद्वार बाहेर श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणा पाहण्यास तसेच दर्शन घेण्यास गर्दी  प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यासह इतर प्रांतातुन हजारो वैष्णव अलंकापुरीत येऊन दाखलपालखी सोहळ्यात वरूण राजाची हजेरी

आळंदी : वारकरी भाविकांचे दैवत श्रीगुरु पांडुरंगरायांना भेटण्यासह दर्शनाचे ओढीने राज्य परिसरातून अलंकापुरीत दाखल लाखो वैष्णव भाविकांच्या नाम जयघोषात संत शिरोमणी,ज्ञानचक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज माउलींच्या वैभवी पालखी सोहळ्याचे मंगळवारी ( दि.२५ ) सायंकाळी सातच्या सुमारास माउली मंदिरातून परंपरेचे पालन करीत पंढरीला जाण्यास प्रस्थान केले.लाखो भाविकांचे श्री विठ्ठल , ज्ञानोबा माउली, ज्ञानोबा माउली, तुकाराम असा हरिनामजयघोष , वीणा,टाळ-मृदंगाचा गजरात प्रस्थान झाले.यावेळी लाखो वैष्णव भक्ती रसात न्हाऊन निघाले. ऊन सावलीचे खेळात श्रींचे प्रस्थान हरिनाम गजरात झाले. श्रींची पालखी गांधी वाड्यातील पाहुणचार घेत सोहळा बुधवारी (दि.२६) पहाटे सहाच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाला. आळंदीत श्रींच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानास मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उर्जितसिंह शितोळे सरकार,महादजी शितोळे सरकार,खासदार बंडू जाधव,माजी आमदार उल्हास पवार,विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी नवल किशोर राम,प्रांत संजय तेली,तहसीलदार सुचित्रा आम्ले,पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर,प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई,विश्वस्त अभय टिळक,अजित कुलकर्णी,आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले मुख्याधिकारी समीर भूमकर,व्यवस्थापक माउली वीर,श्रींचे चोपदार राजाभाऊ चोपदार,रामभाऊ चोपदार,बाळासाहेब चोपदार,आदींसह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यातील नित्य नैमित्तिक धार्मिक उपक्रमास भल्या पहाटेच उत्साहात घंटानादाने प्रारंभ झाला.प्रस्थान दिनी अलंकापुरीत भाविकांची पाऊले सकाळी इंद्रायणीकडे वळली.

तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्याची परंपरा जोपासत इंद्रायणी नदीवर हरिनाम घेत स्नान उरकत भाविकांची पाऊले श्रींचे दर्शन आणि नगरप्रदक्षिणेकडे वळली.दर्शनाला जाण्यापूर्वी स्नान करण्यासाठी पहाटेच इंद्रायणीचा काठ वैष्णवांनी फुलून गेला होता. माउली,माउली ज्ञानोबा माउली तुकाराम,श्री विठ्ठल नाम जयघोषासह भाविकांचे गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमली.श्रींचे प्रस्थान उपचारात ज्ञान भक्तीचा आवाज टिपेला पोचला. भजन,कीर्तनाचा अखंड नाद शहरात घुमला .वयाचे भान हरपून भाविक,वारकरी,वृद्ध महिला,युवक तरुणांचा यात सहभाग राहिला.पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंदिरात भेट देत श्रींचे दर्शन घेत श्रींचे प्रस्थानला हजेरी लावली.यावेळी वारक-यांनी टाळ वाजवीत,फुगडी खेळात वारक-यांचे वैभव असलेल्या पालखी सोहळ्यात फुगड्यांचा फेर जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार ही भक्तीत डांग झाले त्यांनी फुगडी खेळात,ताल वाजवीत फेर धरला. यावेळी प्रस्थांनचे सोहळ्यात टाळ-मृदंग,वीणेचा त्रिनाद भक्तीमयी उत्साह होता. श्रींचे पादुकांचे गाभाऱ्यात पूजेनंतर पादुका संस्थानतर्फे श्रींचे सजलेल्या पालखीत विधिवत पूजा करून वेदमंत्रांचे घोषित विराजित करण्यात आल्या. दरम्यान श्रींचे मंदिरातील भाविकांचा टिपेला गेलेला स्वर आणखी वाढला. भक्ती चैतन्यमयी उत्साहात श्रींची पालखी हरिनाम गजरात निघण्यापूर्वी सोहळ्यातील नारळ प्रसाद,मानाचे पागोटे वाटप झाले.श्रींचे पादुका पालखीत विराजित झाल्यानंतर आरतीनंतर दर्शन होताच आळंदीतील ग्रामस्थांनी श्रींची वैभवी पालखी खांद्यावर घेत पंढरीला जाण्याचे तयारीत माउली माउली असा नामजय घोष करीत वीणा मंडपातून प्रस्थान ठेवत मंदिर प्रदक्षिणा केली.पालखी मंदिरातील प्रदक्षिणा करीत महाद्वारातून आळंदीकरांचे खांद्यावर ग्रामप्रदक्षिणेस महाद्वारातून बाहेर आली. महाद्वार बाहेर लाखो वारकरी,भाविक,नागरिक श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणा पाहण्यास तसेच दर्शन घेण्यास गर्दी केली. दरम्यान पुष्प सजावटीने सजलेल्या पालखीतील श्रींचे पादुकांचे दर्शनास भाविकांची झुंबड उडाली.  श्रींचे मंदिरात प्रस्थान साठी दुपारी एक च्या सुमारास श्रींचे दर्शन बंद करण्यात आले. मंदिर प्रांगण स्वच्छता झाल्यानंतर दुपारी दोन च्या सुमारास मंदिरात दिंड्यादिंड्यातून प्रवेशात वीणा -टाळ-मृदंगाचा गजर सुरु झाला.यावेळी वारक-यांचे सांप्रदायिक खेळ खूपच रंगले.चित्तथरारक मनो-यांनी भाविकांचे लक्ष वेधले.महिला,पुरुष,पदाधिकारी यांच्या फुगड्या ही रंगल्या. सव्वा पाचच्या सुमारास सोहळ्यास अश्व मंदिरात प्रवेशले,भाविकांनी अश्वानाचें दर्शनास गर्दी केली. श्रींची पूजा,नारळ प्रसाद,श्रीगुरु हैबतरावबाबा यांचेसह आळंदी देवस्थानचे वतीने आरती,श्रीचे विधिवत पादुकांची प्राणप्रतिष्ठा होताच सोहळ्यास विना मंडपात आळंदीकर पालखी प्रस्थानला सज्ज झाले. पालखी प्रस्थान सोहळ्यात श्रींचे कर्णा वाजला अन श्रींचे हरिनाम गजरात पुंडलिक वरदे हरि विठ्ठल,माउली-माउली अशा गजरात विना मंडपातून घोष करीत प्रस्थान ठेवले.आळंदीकरांनी श्रींची वैभवी पालखी खांद्यावर घेतली.देऊळवाड्यासहआळंदी ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून श्रींचा वैभवी पालखी सोहळा शाही लवाजम्यासह पहिल्या मुक्कामास जुन्या गांधी वाड्यातील आजोळघरी रात्री पोहोचला. प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यासह इतर प्रांतातुन हजारो वैष्णव अलंकापुरीत येऊन दाखल झाले होते. यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेकांची शेतीची कामे अपुरी असल्याने याचा गर्दीवर परिणाम झाला. मात्र सोहळ्याचे काळात वरूण राजाने हजेरी लावुन बरसण्यास हलक्या स्वरूपात सुरूवात केल्याने बळीराजा काहीसा सुखावला. गेल्या दोन दिवसांपासूनच आळंदी गजबजुन गेली आहे. टाळ - मृदुंगाचा गजर, हरिनामाचा. जयघोष सर्वत्र निनादला.पाऊसाने ओढा दिली असली तरी इंद्रायणी नदीत पुरेसा जलसाठा असल्याने भाविकांचे स्नानाची चांगली सोय झाली.यासाठी धरणातुन पाणी सोडण्यात आले होते.याच पाण्यात आलेल्या लाखो भाविकांनी पवित्र स्नान देखील केले.  पहाटे घंटानाद, काकडा आरती,अभिषेक,पंचामृत,पुजा,दुधारती,महापूजा,भाविकांचे दर्शन करीत धार्मिक कार्यक्रम पूजा पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांचे हस्ते झाली. 

सप्तशृंगीगड देवी आईसाहेब माऊलींचे दैवत ; स्नेहवस्त्र अर्पण  दरम्यान प्रस्थापूर्वी आळंदी मंदिरात सप्तशृंगीगड देवी हे आईसाहेब माऊलींचे दैवत असल्याने येथील कार्यकारी व्यवस्थापक सुदर्शनजी दहातोंडे, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई,प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील,विश्वस्त अभय टिळक,अजित कुलकर्णी,वणी देवस्थानचे मंगेश भोंगळें,नानाजी भामरे, प्रसाद शेलार,तुषार जाधव,स्वामी सुभाष महाराज,पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार,वैभव सोमवंशी,राजेंद्र पवार यांचे उपस्थितीत श्रींचे संजीवन समाधीची पूजा करून कृपाशिर्वादरूपी आईसाहेबांच्या स्नेहवस्त्र अर्पण करण्यात आले. प्रस्थान दिनी देऊळवाडा स्वकाम सेवा मंडळ व सामाजिक विश्व संस्था यांनी स्वच्छ करीत सेवा रुजू केली. आळंदीत पालखी मार्गावर रांगोळी काढत अनेकांनी सेवा अर्पण केली.व्यापारी तरुण मंडळाने  पुष्प सजावट करून सोहळ्यातील सेवेची परंपरा जोपासली. यासाठी अनिल फासाटे ,ज्ञानेश्वर फासाटे,माउली गुळुंजकर,रमेश कार्ले,चिराग फासाटे,दत्त घुंडरे,अजित मधवें,राजेंद्र गावडे,माउली ठाकूर आदींनी काम पहिले. मंदिरात केवळ पासधारकांना प्रवेश देण्यात आला. टाळ - मृदुंगाचा गजर, माऊली - माऊलीचा नामजयघोष , दिंड्या - दिंड्यांमधुन घुमला.यावेळी संप्रदायातील विविध खेळ रंगले. यावेळी आळंदीकर ग्रामस्थ व खांदेक-यांनी  तुळशीच्या माळा , सुगंधी फुले यांनी सजविलेली पालखी खांद्यावर घेत माऊली माऊली असा गजर केला.भागवत धमार्ची भगवी पताका उंचावत  अलंकापुरी नगरीत माऊली - तुकोबाच्या जयघोषाने सारा आसमंतच दुमदुमला होता. ॅ

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAlandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी