शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

लाेकमत पां. वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पुरस्कारांचे वितरण रविवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 9:37 AM

आर्थिक-विकासात्मक लेखन, पत्रकारितेचा हाेणार सन्मान, लाेकमततर्फे संबंधित वर्षभरात मराठी भाषेतील वृत्तपत्रे, नियतकालिके व मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख व बातम्यांना याद्वारे पुरस्कृत करण्यात येते.

नागपूर : लाेकमतचे प्रथम संपादक पत्रपंडित पद्मश्री पां. वा. गाडगीळ व लाेकमतचे ज्येष्ठ संपादक पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारे आर्थिक-विकासात्मक लेखन पत्रकारिता आणि शाेधपत्रकारिता या श्रेणीत जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांचा वितरण समारंभ येत्या रविवार, ७ जुलै राेजी आयाेजित करण्यात आला आहे. 

लाेकमततर्फे संबंधित वर्षभरात मराठी भाषेतील वृत्तपत्रे, नियतकालिके व मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख व बातम्यांना याद्वारे पुरस्कृत करण्यात येते. या स्पर्धेअंतर्गत २०२१ व २०२२ च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण साेहळा येत्या ७ जुलै राेजी वसंतराव नाईक मेमोरियल हाॅल (वनामती), व्हीआयपी राेड, गाेरेपेठ येथे दुपारी २ वाजता आयाेजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राचे उद्याेगमंत्री उदय सामंत, द न्यू इंडियन एक्सप्रेस, नवी दिल्लीचे संपादकीय संचालक प्रभू चावला व लाेकमत एडिटोरियल बाेर्डचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डाॅ. विजय दर्डा हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 

दाेन्ही श्रेणीतील पुरस्कार विजेते  

पां. वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा : वर्ष २०२१ : प्रथम पुरस्कार : वंदना धर्माधिकारी, पुणे. (आत्मनिर्भर, साप्ताहिक अर्थशक्ती), द्वितीय पुरस्कार : विनोद धनाजी शेंडे, पुणे. (भूक निर्देशांक : घसरणीचा विकास, लोकसत्ता) तृतीय पुरस्कार - प्रवीण घोडेस्वार, (महिला स्वच्छता कामगारांची दयनीय अवस्था, मिळून साऱ्याजणी).

वर्ष २०२२ ; प्रथम पुरस्कार : सूर्यकांत पाठक, पुणे. (ग्राहक हक्कांना मिळणार बळकटी, ग्राहकहित), द्वितीय पुरस्कार : डॉ. प्रतिमा इंगोले, अमरावती. (शेतीचा शोध घेऊनही स्त्रीची आर्थिक कोंडी, पुण्यनगरी), तृतीय पुरस्कार : समीर मराठे, नाशिक (ट्रक ड्रायव्हर्सच्या आयुष्यावरील लेख, ‘उस्ताद’, लोकमत).

म.य. उपाख्य बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा- वर्ष २०२१; प्रथम पुरस्कार - डॉ. योगेश प्रकाश पांडे, नागपूर (नागपुरात ‘नीट’चा घोटाळा, लोकमत). द्वितीय पुरस्कार- विश्वास पाटील, कोल्हापूर. (दामदुप्पट परताव्याचा भूलभुलैया, लोकमत). तृतीय पुरस्कार-विवेक भुसे, पुणे. (राज्यभर गाजलेल्या स्पर्धा परीक्षा गैरव्यवहार, लोकमत). 

वर्ष २०२२-प्रथम पुरस्कार : बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर. (शेकडो कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्याचा भंडाफोड, लोकमत). द्वितीय पुरस्कार- इंदुमती सूर्यवंशी, कोल्हापूर. (जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षांपूर्वीच विक्री, लोकमत). तृतीय पुरस्कार- सुमेध वाघमारे, नागपूर. (शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरचा अभाव, लोकमत) 

पुरस्कारांचे स्वरूप, राेख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धांचे परीक्षण ज्येष्ठ संपादक कमलाकर धारप व दिलीप तिखिले यांनी केले आहे.