शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
7
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
8
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
9
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
10
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
11
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
12
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
13
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
14
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
15
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
16
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
17
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
18
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
19
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
20
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'

राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आंदोलकांवर लाठीमार

By admin | Published: January 07, 2015 10:03 PM

नारायण राणे : आरोंदा जेटीप्रकरणी आरोप

कुडाळ : ज्या लोकांनी मते दिली, त्याच लोकांना रक्तबंबाळ करण्याचे काम येथील राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून झाले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आरोंदा जेटीप्रकरणी कुडाळ येथे आज, बुधवारी पत्रकार परिषदेत नाव न घेता मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केला.आरोंदा येथील आंदोलनकर्ते ग्रामस्थ, महिला यांच्यावर दगडफेक करून त्यांना रक्तबंबाळ करणाऱ्या कंपनीच्या लोकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नसून, जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडणार, असा इशाराही राणे यांनी दिला. जेटी बांधत असताना जर येथील गणपती विसर्जनाचा, येण्या-जाण्याचा मार्ग बंद होत असेल, स्थानिक मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असेल, राज्य रस्ता बंद करण्यात येत असेल, येथील बोटी नेण्याकरिता पाण्यातील खडक फोडल्याने पुराची स्थिती भविष्यात उद्भवत असेल, तर जनतेने छेडलेले आंदोलन योग्य आहे. त्यामुळे आपण जनतेच्या पाठीशी आहोत. ग्रामस्थ व महिलांवर कंपनीकडून दगडफेक करून जर जेटी सुरू होणार असे वाटत असेल, तर आम्ही तसे कदापी होऊ देणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला. दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना कलमात खाडाखोड करून अटक करण्यात आली व हे येथील राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे. मते देणाऱ्याच लोकांना रक्तबंबाळ करण्याचेही काम त्यांच्या सांगण्यावरून झाले आहे. याबाबतीत ग्रामस्थांच्या विरोधात व आडमार्गाने प्रशासन काम करीत असेल, तर अधिकाऱ्यांना कायद्याची ओळख दाखविण्याचेही काम करेन, असेही सांगितले. अधिकृत रस्ता बंद करणे हा कायद्याने गुन्हा असून, येथील अधिकृत रस्ता करण्यासाठी आम्हाला शासनाची परवानगी काढायची गरज नसून, आम्ही तो रस्ता सुरू करू शकतो. आरोंदा येथील रस्ता सुरू केला नाही तसेच कंपनीच्या लोकांवर कारवाई केली नाही, तर तीव्रतेचे आंदोलन करू, असा इशारा राणेंनी दिला. (प्रतिनिधी)