शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अग्रवाल यांचा नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 7:00 PM

लायन्स  क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे गुरुवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. औरंगाबादकरांच्या प्रेमामुळे सत्कारमूर्ती भारावून गेले. ‘माझे तन पुलकित झाले, मन भावविभोर झाले आणि कंठातून उच्चार बाहेर पडत नाही’,  असा भव्य नागरी सत्कार मी पहिल्यांदाच अनुभवत आहे, अशा शब्दात अग्रवाल यांनी शहरवासीयांचे आभार मानले. 

ठळक मुद्देशहरवासीयांच्या  प्रेमाने सत्कारमूर्ती भारावले लायन्स क्लबचे दुस-या शताब्दी वर्षात पदार्पण डॉ.नरेश अग्रवाल यांच्या नागरी सत्कार सोहळ्यास  ‘शंखनाद’ असे संबोधण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत १०० किलोचा केक कापण्यात आला. केक शहरातील अनाथालय, वृद्धाश्रम, दिव्यांगांच्या आश्रमांना वाटण्यात आला. 

औरंगाबाद , दि. २४ : लायन्स  क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे गुरुवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. सर्वांनी उभे राहून त्यांच्या कार्याचा गौरव केला. औरंगाबादकरांच्या प्रेमामुळे सत्कारमूर्ती भारावून गेले. ‘माझे तन पुलकित झाले, मन भावविभोर झाले आणि कंठातून उच्चार बाहेर पडत नाही’,  असा भव्य नागरी सत्कार मी पहिल्यांदाच अनुभवत आहे, अशा शब्दात अग्रवाल यांनी शहरवासीयांचे आभार मानले. 

२१० देशांमध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सेवाकार्य सुरू आहे. लायन्सने  शताब्दी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करून आज शतकोत्तर पहिल्या वर्षात पाऊल टाकले. या ऐतिहासिकसमयी लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद भूषविण्याचा मान नरेश अग्रवाल या भारतीय उद्योजकांना मिळाला. आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेश अग्रवाल औरंगाबादेत आले होते. 

यानिमित्ताने लायन्स परिवार व औरंगाबादवासीयांतर्फे सकाळी तापडिया नाट्यमंदिरात त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. महापौर भगवान घडामोडे व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी नरेश अग्रवाल यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. आ. सतीश चव्हाण, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. इम्तियाज जलील, आ. विक्रम काळे, माजी आ. एम. एम. शेख, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे यांची सोहळ्यास उपस्थिती होती. व्यासपीठावर माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, विविध समित्यांचे अध्यक्ष राजे मुधोजी भोसले, आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. नवल मालू, प्रांतपाल संदीप मालू, प्रांतपाल गिरीश मालपाणी, वासुदेव कलघटगी,  सुनील व्होरा, डॉ. संजय व्होरा, नितीन बंग आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी राजेंद्र दर्डा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. यानंतर नरेश अग्रवाल यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अग्रवाल म्हणाले की, हा नरेश अग्रवाल यांचा सत्कार नव्हे, हा सन्मान भारतीय तिरंगा झेंड्याचा आहे. सव्वाकोटी भारतीयांचा हा सन्मान आहे. मी ज्या देशांमध्ये लायन्सचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जातो तेथे प्रथम आपले राष्ट्रगीत म्हटले जाते. मला अभिमान वाटतो, मी हिंदुस्थानी असल्याचा. जगभरात सेवाकार्य करण्यासाठी लायन्सने आपली संख्या व ताकद वाढविली पाहिजे. सध्या देशात २ लाख ३५ हजार लायन्स आहेत. येत्या काळात नवीन सदस्यांची संख्या ५ लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट त्यांनी सर्व लायन्स सदस्यांसमोर ठेवले. त्यास सर्वांनी हात उंच करून होकार दिला.

तत्पूर्वी अवघ्या ५१ दिवसांत नवीन २३ क्लब व ५५५ नवीन सदस्य केल्याबद्दल प्रांतपाल संदीप मालू यांचा गौरव करण्यात आला. तसेच माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली. यावेळी ‘सेकंड सेंच्युरी अ‍ॅम्बॅसेडर’ झालेल्या लायन्स पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.नवल मालू व महावीर पाटणी यांनी करून दिला. प्रशांत वर्मा यांनी सूत्रसंचालन केले तर अमोल गंभीर यांनी आभार मानले. 

नवविचाराचा ‘शंखनाद ’  डॉ.नरेश अग्रवाल यांच्या नागरी सत्कार सोहळ्यास  ‘शंखनाद’ असे संबोधण्यात आले होते. हा धागा पकडून अग्रवाल म्हणाले की, आज मी औरंगाबादेतून या सोहळ्याद्वारे नवीन विचाराचा शंखनाद करतो. ‘एकीचे बळ, ऐक्यातून कृती व कृतीतून सेवा’चा संदेश लायन्सच्या सदस्यांना त्यांनी दिला. समाजसेवेसाठी सर्वांनी झटून काम करण्याची मानसिकता तयार करा, असे आवाहनही त्यांनी केले.  

१०० किलोचा केक व धान्यतुला लायन्स क्लबच्या शताब्दी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नरेश अग्रवाल यांची धान्यतुला करण्यात आली. हे धान्य इस्कॉनच्या अन्न अमृत योजनेत देण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत १०० किलोचा केक कापण्यात आला. हा केक शहरातील अनाथालय, वृद्धाश्रम, दिव्यांगांच्या आश्रमांना वाटण्यात आला.