शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मुंबई-नागपूर महामार्गाचे भूसंपादन

By admin | Published: August 13, 2016 3:06 AM

मुंबई-नागपूर या ७५० किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’च्या भूसंपादनासाठी आंध्र प्रदेशची प्रस्तावीत राजधानी अमरावतीसाठी वापरलेला पॅटर्न लागू करण्यात

औरंगाबाद : मुंबई-नागपूर या ७५० किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’च्या भूसंपादनासाठी आंध्र प्रदेशची प्रस्तावीत राजधानी अमरावतीसाठी वापरलेला पॅटर्न लागू करण्यात आला असून, ४ महिन्यांत त्यासाठी भूसंपादन करण्याचे आदेश ११ जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना शुक्रवारी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिले. भूसंपादनाच्या ४७२ कलमानुसार नोटिफिकेशन जारी झाले असून शुक्रवारपासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. भूसंपादनासाठी रोख मोबदला, लॅण्ड पुलिंग सिस्टीम आणि भागीदारी, असे तीन पर्याय ५ जुलैच्या आदेशात असून, भूमालकांच्या सहमतीने संपादन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोपलवार म्हणाले, या महामार्गावर २१ टाऊनशिप होतील. मराठवाडा समृद्धीचा हा महामार्ग १५० किलोमीटर औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतून जाणार असून, त्या मार्गावर ४ टाऊनशिप होतील. ३२ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. हा मार्ग होणारच यात कुठलीही शंका नाही. भूसंपादनासाठी कुठलीही जबरदस्ती राहणार नाही. ४१० कि़ मी. च्या पट्ट्यात कोरडवाहू जमीन आहे. नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, ठाणे, अहमदनगर, औरंगाबादमध्ये विरोध नाही. बुलडाण्यात काही ठिकाणी शंका आहेत. नाशिकमध्ये बागायती जमिनीमुळे थोडी अडचण आहे. भूसंपादनासाठी दीड वर्षाचा नियम जरी असला तरी ४ महिन्यांत संपादन व्हावे, असे ठरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)काय आहे आंध्र पॅटर्नआंध्रच्या भूसंपादन पॅटर्ननुसार शेतजमीन मालकांना संपादित जमिनीच्या २५ टक्के बिगरकृषी जमीन दिली जाते. तसेच जिरायती (कोरडवाहू) जमीन संपादित झाली असेल, तर वर्षाकाठी ३० हजार रुपये आणि बागायती शेतीसाठी वार्षिक ५० हजार रुपये दिले जातात.- नागपूर-सेलडोह-वर्धा-येळी-पुलगाव-धामणगाव-वखफळी-कारंजा लाड-सेलू बाजार-मालेगाव-मेहकर-दुसरबीड-सिंदखेडराजा-जालना- शेंद्रा-औरंगाबाद-सावंगी-दौलताबाद-लासूर-वैजापूर-शिर्डी-गोंदे-पिंपळगाव मोर-घोटी/देवळी-खर्डी-शहापूरजवळील कासेगाव-वडपे (भिवंडी बायपास) असा हा सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे असेल. पुढे ते कापूरबावडी जंक्शनवरून मुंबई असा जाईल.