शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

राज्यभरातील गावठाणांचे भूमापन ३३ ड्रोनच्या सहाय्याने!; मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 6:43 AM

भूमापनाचे काम पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

पुणे: राज्यातील तब्बल चाळीस हजार गावठाणांच्या भूमापनाचे काम पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट भूमिअभिलेख विभागाने ठेवले असून त्यासाठी सुमारे ३३ ड्रोनचा वापर केला जाणार आहे. सर्व्हे आॅफ इंडियाच्या मदतीने भूमापनाचे काम करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक ड्रोन पथक या पद्धतीने भूमापनाचे काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहे.अनेक वर्षांपासून सुमारे ४० हजार गांवाच्या गावठाणाचे भूमापन रखडले होते. कमी कालावधीत व जलद गतीने गावठाणाच्या भूमापनाचे काम ड्रोनच्या सहाय्याने होणार असल्याने त्यास राज्यमंत्री मंडळाने मंजूरी दिली. त्यासाठी सुमारे २७० कोटी रुपये खर्च येणार असून देशात या पद्धतीने प्रथमच मोजणी केली जाणार आहे.राज्यातील ४३ हजार ६६४ गावांमध्ये ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून अधिकार अभिलेख ७/१२ उतारा उपलब्ध आहे. तर गावठाणातील घरांचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून गावठाणातील भूमापन करून नकाशा व मिळकत पत्रिका दिली जाते. मात्र, महसूल विभागाकडील अपुऱ्या मनुष्यबळामुळे आत्तापर्यंत राज्यातील केवळ ३ हजार ९३१ गावांच्या गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३९ हजार ७३३ गावांचे गावठाणाचे भूमापन करून प्रत्येक जागा धारकास नकाशे व मिळकत पत्रिका तयार करणे सध्याच्या मनुष्यबळाच्या व जुन्या पद्धतीनुसार केवळ अशक्य होते. त्यामुळे त्यानंतर त्वरीतच भूमिअभिलेख विभागाने पुढील तयारी सुरू केली आहे.राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभिलेख एस.चोक्कलिंगम म्हणाले, ड्रोनव्दारे प्रत्यक्षात मोजणी करण्यापूर्वी सर्व्हे आॅफ इंडियाच्यावतीने मोजणी करण्यात येणाºया गावामध्ये जीपीएस यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे चालावी यासाठी एक स्टेशन उभारले जाईल. संबंधित जागेच्या मोजणीसाठी पांढºया चुन्याने आऊट लाईन मारला जातील. त्यानंतर ड्रोनव्दारे फोटोे काढून मोजणीचे प्रक्रिया पूर्ण केले जाईल.ड्रोनच्या मदतीने केल्या जाणाºया मोजणीसाठी राज्य शासनाने सुमारे २७१ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढील तीन वर्षात मोजणीचा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर शासनाकडून घेतलेला निधी परत केला जाणार आहे. नागरिकांना दिल्या जाणाºया सनदेसाठी केवळ तीनशे ते एक हजार रूपये आकारले जाणार आहेत. जमिनीच्या मालकीचे कागदपत्र मिळणार असल्याने नागरिकांना त्याचा विविध कारणांसाठी वापर करता येऊ शकतो. पुढील तीस वर्षात न होऊ शकणारी बाब ड्रोनच्या भूमापन पद्धतीमुळे ३ वर्षात पूर्ण होणार आहे.- एस. चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त,संचालक भूमिअभिलेख, महाराष्ट्र राज्यड्रोनच्या माध्यमातून केल्या जाणाºया मोजणीनंतरनागरिकांना सनद मिळणारआहे. यामुळे ग्रामीणभागातील जमीनींना चांगलेभाव येणार आहेत.त्याचप्रमाणे गावठाणाच्याजागेत होणारे अतिक्रमणकाढणे शक्यहोणार आहे.