शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

‘एम्स’साठी जमिनीचे हस्तांतरण

By admin | Published: July 14, 2015 12:56 AM

मिहानमध्ये ‘गोल्फ कोर्स’साठी आरक्षित असलेल्या १५० एकरच्या जमिनीवर आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) डोलारा उभा राहणार आहे. ‘एम्स’च्या निर्माण कार्यासाठी ही जागा

- सुमेध वाघमारे/राजीव सिंग,  नागपूरमिहानमध्ये ‘गोल्फ कोर्स’साठी आरक्षित असलेल्या १५० एकरच्या जमिनीवर आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) डोलारा उभा राहणार आहे. ‘एम्स’च्या निर्माण कार्यासाठी ही जागा ‘हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटन्सी कॉर्पाेरेशन लिमिटेड’ला (एचएससीसी) हस्तांतरित करण्याच्या तयारीला वेग आला आहे. त्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला प्रस्तावित जागेवर पाणी, वीज व चौपदरी रस्ता उपलब्ध करून द्यायचे आहे.२०१४-१५च्या अर्थसंकल्पात देशात चार नवीन ‘एम्स’ उभारण्याच्या निर्णयानंतर लगेचच केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये ‘एम्स’ नागपुरात होत असल्याची घोषणा केली. सुरुवातीला हा प्रकल्प मेडिकलच्या टीबी वॉर्डासह, मध्यवर्ती कारागृहामागील जागा, लघु सिंचन विभागाची जागा आणि मेडिकलच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील वैद्यकीय वसाहतीची अशी एकूण साधारण २०० एकर जागेवर उभारण्याचे प्रस्तावित होते. परंतु तेथील विविध विभाग हलविणे खर्चिक आणि वेळखाऊ होते. त्यामुळे ‘एम्स’च्या अभ्यासमंडळाने मिहानमधील जागेचाही शोध घेतला. मिहान आणि टीबी वॉर्ड अशा दोन्ही ठिकाणी एम्सचा विचार सुरू झाला होता. मे महिन्यात मुंबईमध्ये ‘एम्स’ व महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या (एमएडीसी) प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात मिहानमधील ‘सेझ’ बाहेर सरकारी संस्थांना जमीन देण्यासाठी निविदेची गरज नाही, असा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याआधारे ‘एम्स’साठी १५० एकर जागा राखीव ठेवण्यात आली. पूर्वी ही जागा गोल्फ कोर्ससाठी राखीव ठेवण्यात आली होती. वीज उलब्धतेसाठी देणार पत्र : एचएससीसीकडे जागा हस्तांतरण करण्यापूर्वी वीज, पाणी व चौपदरी रस्ता उपलब्ध करून देण्याचे केंद्र सचिवांचे निर्देश आहे. त्यानुसार प्रस्तावित जागेवर पाणी व चौपदरी रस्ता आहे गरज आहे फक्त ती विजेची. या संदर्भात लवकरच विद्युत महामंडळाला पत्र दिले जाणार आहे.५० एकरांचा घोळ : प्रकल्पासाठी आणखी आवश्यक असलेल्या ५० एकरच्या जागेचा घोळ अद्यापही सुटलेला नाही. ‘एमएडीसी’नुसार ‘एम्स’चे एक युनिट मेडिकलच्या टीबी वॉर्डातील ५० एकर जागेवर होईल, तर ‘सेझ’मध्येच ही जागा उपलब्ध करून देण्याला तांत्रिक मंजुरी मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.एचएससीसी करणार बांधकाम एम्स निर्माणाची मुख्य कार्यदायी संस्था, एचएससीसी ही केंद्राच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयांतर्गत काम करते. नागपूरच्या एम्सच्या बांधकामाची जबाबदारीही याच संस्थेकडे राहणार आहे. यामुळे एम्सची प्रस्तावित जागा या संस्थेकडे हस्तांतरित करा, असे निर्देश केंद्रीय सचिवांकडून गेल्या आठवड्यात प्राप्त झाल्याची माहिती आहे.मिहानमधील गोल्फ कोर्ससाठी आरक्षित असलेली १५० एकरची जागा ‘एम्स’साठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जमिनीच्या हस्तांतरणाच्या संदर्भात एचएससीसी इंडिया लिमिटेडचे पथक लवकरच नागपुरात येणार आहे. - एस.व्ही, चहांदे,मुख्य अभियंता, एमएडीसी‘एचएससीसी’ला जागा हस्तांतरण करण्याच्या केंद्र सचिवांच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रस्तावित जागेवर पाणी व चौपदरी रस्ता उपलब्ध आहे. आवश्यक विजेसाठी लवकरच विद्युत महामंडळाला पत्र देण्यात येणार आहे.- डॉ. प्रकाश वाकोडे,नोडल अधिकारी, एम्स