शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

भूमिहीन मजुरांनीही घेतली शहराकडे धाव

By admin | Published: May 17, 2016 3:40 AM

राज्यातील दुष्काळाचे संकट, पावसावर आधारीत शेती, भूमिहीन, स्थानिक रोजगारांच्या संधी न मिळाल्याने आदिवासी बांधवांनी शहराकडे धाव घेतली

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- राज्यातील दुष्काळाचे संकट, पावसावर आधारीत शेती, भूमिहीन, स्थानिक रोजगारांच्या संधी न मिळाल्याने आदिवासी बांधवांनी शहराकडे धाव घेतली आहे. उपजीविकेचे एकमेव साधन असलेल्या राज्याच्या पोशिंद्यावर आत्महत्येची वेळ आली असून दुसऱ्याच्या शेतावर काम करणाऱ्या मजुरांनी कसे घर चालवायचे, असा प्रश्न समोर उभा राहिल्याची प्रतिक्रिया विदर्भातील किशोर पवार यांनी दिली. गावाकडे उपासमारीची वेळ आल्याने कुटुंबासोबत नवी मुंबई स्थलांतर केलेल्या पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना मिळेल ते काम करून दोन वेळच्या जेवणाची सोय करीत असून, कसाबसा संसाराचा गाडा ओढत असल्याचे सांगितले.बेलापूर परिसरातही २०हून अधिक कुटुंबे स्थलांतरित झाली असून, दुष्काळाची झळ सोसणे मुश्कील झाल्याने गाव सोडून शहराची वाट धरली आहे. या कुटुंबीयांनी आपल्या चिमुकल्यांबरोबर ठिकठिकाणी उघड्यावर संसार थाटला असून, शहरातही अनेक समस्यांशी झुंजावे लागत असल्याची प्रतिक्रिया या स्थलांतरित कुटुंबीयांनी व्यक्त केली. अनेकवेळा लाठीमार करून उठविले जात असून, मग आम्ही राहायचे कुठे, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. आम्ही झोपड्या बांधून राहत नाही, पण जिथे झोपण्यापुरता जागा मिळेल तिथे आम्ही आमच्या कुटुंबाची सोय करतो; तरीदेखील आम्हाला प्रत्येक परिसरातून हाकलण्यात येथे. शहरातील नागरिक तसेच तिथल्या प्रशासनाला आम्हाला कसलाही त्रास द्यायचा नसतो, पण आम्हाला एखादी जागा मिळवून दिली दर पावसाळ्यापर्यंत तरी आमच्या पोराबाळांना उघड्यावर राहावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या जयहिंद पवार यांनी व्यक्त केली. बांधकाम, वीटभट्टी, खाणकाम अशी कामे करून शहरात रोजगार मिळवतो, परंतु रोजच्या रोज हाताला काम मिळत नसल्याने कुटुंबाची उपासमार होते. महागाई वाढल्याने दोन वेळची भूक भागविण्यासाठीही दिवसभर कामधंदा शोधत फिरावे लागते. दारोदारी जाऊन पाणी मागून तहान भागवावी लागते. तरुणांना भेडसावतेय रोजगाराची समस्यायवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यातील तरुणही नवी मुंबईत स्थलांतरीत झाले असून, शिक्षण घेऊनही बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. पदवीचा अभ्यास घेतलेल्या तरुणांनाही या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्यांमध्ये काम करावे लागत असल्याने पोराला शिकवून काय फायदा, असाही प्रश्न येथील पवार कुटुंबीयांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. शासनाने दुष्काळाने होरपळलेल्या शेतकरी कुटुंबातील बेरोजगार तरुणांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी या तरुणांनी केली आहे. तान्ही मुलं घेऊन शहराकडे धाव घेतली, पण इथही आमचे हाल होत आहेत. उघड्यावर राहिल्याने मुलांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. उपचारासाठी पैसे नसल्याने आमच्याबरोबर या लेकरांचीही फरफट होत असल्याचे अमरावती येथून आलेल्या सरिता पवार यांनी व्यक्त केली आहे. मुलाला असलेल्या आजारावर डॉक्टरांनी आॅपरेशन हा एकमेव पर्याय सांगितला असून, पैशाअभावी उपचार करता येत नसल्याचीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.