कोल्हापूर : ‘कोरोना’च्या धास्तीने करवीरनिवासिनी अंबाबाईमंदिर आज मध्यरात्रीपासून दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते. या बैठकीला सर्व पक्षिय नेते उपस्थित होते देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भाविकांची संख्या रोडावली. तर वाडीरत्नागिरी येथील दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिरही प्रशासनाने रविवारपासूनच बंद केले होते. त्यामुळे भाविकांना दक्षिणद्वारामधील कमानीच्या बाहेरूनच कळसाचे दर्शन घ्यावे लागले. वाढत्या कोरोना विषाणू्च्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर सॅनिटायझर देऊनच मंदिरात प्रवेश दिला जात होता. याकरिता देवस्थानने ८० लिटर सॅनिटायझरचा साठा केला आहे. तर रोज किमान ३० ते ४० हजार भाविक देवीचे दर्शन नियमित घेतात. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे हीच संख्या दिवसभरात २७०० ते ३००० वर आली आहे.