शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

१६ वर्षांत ११२ पर्यटकांना जलसमाधी

By admin | Published: February 02, 2016 4:08 AM

पर्यटकांचा अतिउत्साह आणि सुरक्षेच्या अपुऱ्या सुविधांमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे धोकादायक ठरत आहेत. गेल्या १६ वर्षांत तेथे सुमारे ११२ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

आविष्कार देसाई,  अलिबाग पर्यटकांचा अतिउत्साह आणि सुरक्षेच्या अपुऱ्या सुविधांमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे धोकादायक ठरत आहेत. गेल्या १६ वर्षांत तेथे सुमारे ११२ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मुरूड, काशिद, राजपुरी समुद्रकिनारी २००० ते २०१६ या कालावधीत सुमारे ८४ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर अलिबाग तालुक्यात २८ जणांना जीव गमावावा लागला आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुरूडला भेट दिली. नगर परिषदेने धोक्याचे बोर्ड लावणे गरजेचे होते, असे ते म्हणाले. अलिबाग मुंबई-पुण्यापासून जवळ आहे. सहलीसाठी तिथे जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे असते. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांचे विशेष आकर्षण असते, मात्र भरती-ओहोटी आणि समुद्राच्या रौद्रतेची त्यांना कल्पना नसते. त्यामुळे दुर्घटना घडतात.नांदगाव : मुले बुडाल्याची माहिती कळताच मुरूड शहरातील हिंदू-मुस्लीम लोक बहुसंख्येने समुद्रकिनारी आले. ज्यांना वाचवण्यात आले त्यांना तातडीने दुचाकीने मुरूड ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यात आले. स्थानिक टांगेवालेसुद्धा मदतीला येऊन त्यांनी सर्व रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. तातडीने १०८ या अ‍ॅम्ब्युलन्सला पाचारण करण्यात आले. विविध ठिकाणी आढळलेले विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केला गेला. केवळ १०८ची मदत न घेता मुरूड व्यापारी बँकेच्या अ‍ॅम्ब्युलन्स गाडीचीही मदत घेण्यात आली. सर्व लोक मदतीसाठी धावत होते. (वार्ताहर)पुणे : महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सहलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी स्थानिक नागरिकांनी सुचविलेल्या ठिकाणीच समुद्रकिनाऱ्यावर जावे, महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, काही विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही दु:खद घटना घडली. त्यातही समुद्रकिनारी जीवरक्षक असते तर विद्यार्थ्यांचा जीव वाचला असता, असे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार यांनी सांगितले.समुद्रातील उंच सखल भागातील पाण्यात मुले गेल्याने ही घटना घडली. महाविद्यालयाकडून अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते की इतर कोणत्या सहलीचे यासंदर्भातील माहिती महाविद्यालाकडून घेतली जाईल, अशी माहिती पुणे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेड यांनी दिली.मुरूड समुद्रकिनारी गेल्या सहा महिन्यांत दुसरी दुर्घटना घडली आहे. आॅगस्ट २०१५ रोजी चेंबूर, घाटला परिसरातील काही व्यावसायिक पर्यटनासाठी आले असता त्यापैकी सहा जणांना जलसमाधी मिळाली होती. मुरूड येथील पार्वती लॉजमागील समुद्रकिनारी धोक्याच्या ठिकाणी, जिथे भोवरा तयार होतो तिथेच हे व्यावसायिक पोहण्यासाठी गेले होते. त्यात सहा जणांनी जीव गमावला होता. या घटनेला सहा महिने पूर्ण होतात तोच पुणे कॅम्प येथील अबिदा इनामदार सीनिअर कॉलेजचे विद्यार्थी मुरूडच्या किनाऱ्यावर बुडून मृत्युमुखी पडले. स्थानिक टांगेवाल्यांनी त्यांना अडवले होते, मात्र त्यांचे न ऐकता ते समुद्रात उतरले. अवघ्या ३५ मिनिटांत ते बुडाले. नगर परिषदेने अद्याप पर्यटकांसाठी कायमस्वरूपी जीवरक्षक नेमलेले नाहीत. धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. (वार्ताहर)