मुंबई : भायखळ्याजवळील चामरलाइन पादचारी पूल पाडून तेथे नवीन पूल बनवण्यात येणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने जानेवारीच्या २८ तारखेला रात्री ११.४0 ते २९ तारखेच्या पहाटे ५.५0 पर्यंत ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २८ तारखेला सीएसटीहून सुटणारी शेवटची सीएसटी-ठाणे (मध्यरात्री १२.३४ वा.) लोकल रद्द करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. या कामानिमित्ताने सीएसटी ते परेल दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. २८ जानेवारी रोजी रात्री ११.३0 ते २९ जानेवारी रोजी पहाटे ५.४६ पर्यंत सीएसटीहून सुटणाऱ्या धिम्या लोकल जलद मार्गावर वळवल्या जातील. तर अप धिम्या लोकलही सीएसटी ते परेल दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील मशीद, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड स्थानक उपलब्ध होणार नाही. धिमा मार्ग उपलब्ध होणार नसल्याने प्रवाशांना दादर, भायखळा किंवा सीएसटीपर्यंत लोकल पकडण्यासाठी धावपळ करावी लागेल. (प्रतिनिधी)रविवारी मुलुंड ते माटुंगा दरम्यान मेगाब्लॉक२९ जानेवारी रोजी मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड ते परेल दरम्यान अप धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. या कामामुळे लोकल १५ ते २0 मिनिटे उशिराने धावतील. ट्रेन नंबर ५0१0३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर अणि ५0१0४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत चालवण्यात येईल आणि याच स्थानकातून सुटेल. हार्बर मार्गावरही सीएसटी ते चुनाभट्टी-माहीम दरम्यान सकाळी ११.४0 ते संध्याकाळी ४.४0 पर्यंत ब्लॉक असेल.रद्द लोकल : डाऊन : सीएसटी ते कुर्ला - २८ तारखेच्या रात्री ११.२५ वा. आणि रात्री ११.४८ वा., सीएसटी ते ठाणे - २८ तारखेच्या मध्यरात्री १२.३४ वा. अप : कुर्ला ते सीएसटी - २९ तारखेची पहाटेच्या ५.४२ आणि ५.५४ वाजताच्या लोकल.२८ तारखेला सीएसटीकडे येणारी रात्री १0.१५ ची खोपोली, रात्री १0.३५ ची कसारा आणि रात्री ११.0५ ची बदलापूर लोकल दादर स्थानकातच थांबवण्यात येईल. अंशत: रद्द होणाऱ्या लोकल२९ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता सीएसटी ते कसारा सुटणारी लोकल दादर येथून ५.१८ वाजता सुटेल. २९ जानेवारी रोजी सीएसटी-आसनगाव ५.१२ वाजता सुटणारी लोकल विद्याविहार येथून ५.४३ वाजता सुटेल.
पुलाच्या कामामुळे आज सीएसटीहून शेवटची लोकल रद्द
By admin | Published: January 28, 2017 4:08 AM