अझहर शेख : नाशिक : ‘नाशिककर पहिल्या सहा तासांत फक्त ३० टक्के मतदान झालयं? हा आकडा नाशिककरांच्या उत्साहाला शोभणारा नाही. यावेळी सर्वाधिक मतदान आपल्या नाशिकमधुन करायचयं ना? परंतु ठाणे, पुणे, अकोलासुध्दा आपल्या पुढे...तुम्हाला वाटत नाही का आपल्या नाशिकसाठी चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यावे? नाशिककरांनो बाहेर पडा, मतदान करा, पुढील पाच वर्षे संधी नाही...आपल्या नाशिकच्या प्रगतीसाठी आपण एवढे तर कराल ना..? लोकशाही सणाचा आनंद लुटा, हा संदेश पुढेही पाठवा.’ अशी भावनिक साद नाशिककरांनी व्हॉटस् अॅपवरून घातली.बहुसदस्सीय पध्दतीने राबविली जाणारी मतदान प्रक्रिया, नवीन प्रभाग रचना, मतदार याद्यांचा झालेला घोळ, उन्हाची तीव्रता, नावांची शोधाशोध, राहत्या परिसरापासून दूर अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर आलेले क्रमांक अशा एक ना अनेक कारणांमुळे नाशिककरांना मतदानाचा हक्क बजावताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. याचा थेट परिणाम झाला तो मतदानाच्या टक्केवारीवर. पहिले सहा तास उलटूनदेखील केवळ तीस टक्के मतदान महापालिकेच्या निवडणूकीचे झाल्याने सर्वच जागरूक नेटीझन्सला धडकी भरली. त्यांनी तत्काळ व्हॉटस्अॅपचे हत्यार उपसले आणि त्यावर वरील मजकुराची पोस्ट तयार करून ती विविध ग्रूपमधून व्हायरल केली.
...अन् लागल्या लांबलचक रांगाया पोस्टचा सकारात्मक प्रभाव मतदारांवर पडला. बहुतांश लोकांनी मरगळ झटकून कंटाळा न करता थोडाफार मनस्ताप सहन करण्याची मनाची तयारी करून घराचा उंबरा ओलांडला.ज्या केंद्रांवर दुपारी दोन वाजेपर्यंत तुरळक गर्दी दिसून येत होती त्याच केंद्रांवर चार वाजेनंतर मतदारांनी लोकशाहीचा अधिकार आणि राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी केल्याने लांबलचक रांगा परिसरात दिसून येत होत्या. ---------मतदानाचा टक्का वाढण्यासाठी झाली मदतनाशिकच्या मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. त्यामुळे ज्या मतदारांनी मतदान केंद्राचा उंबरा साडेपाच वाजेपर्यंत ओलांडला त्या मतदारांना पोलीसांनी सहकार्य करत मतदान केंद्राच्या आतमध्ये रांगा लावण्यास सांगितले आणि मुख्य प्रवेशद्वार त्यांनतर बंद करुन घेतले. यावेळी देखील काही नागरिक ‘देर आयें पर दुरूस्त आयें...’ या हिंदीमधील म्हणीप्रमाणे मतदान केंद्रावर पोहचले खरे; मात्र मतदानाची वेळ संपल्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आणि आपण मतदानाचा हक्क गमावल्याचे दु:खही चेहऱ्यांवर झळकले.