शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

उशिरा आलेल्या विद्यार्थ्यास शौचालय साफ करण्याची शिक्षा!

By admin | Published: October 13, 2016 3:06 AM

संतप्त पालकांची पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

लोणार , दि. १२- शाळेत येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याकडून शाळेतील शौचालयाची स्वच्छता करून घेतल्याचा खळबळजनक प्रकार नगर पालिकेच्या काटेनगरातील उर्दू पूर्व माध्यमिक शाळेत १0 ऑक्टोबर रोजी घडला. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी मुख्याध्यापकाची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.नगर पालिकेच्या उर्दू पूर्व माध्यमिक शाळेच्या इयत्ता ७ वीत शिक्षण घेणारा शे. रेहान शे.उस्मान या विद्यार्थ्यास काही कारणास्तव शाळेत येण्यास उशीर झाला. शाळेत पोहोचला त्यावेळी राष्ट्रगीत सुरू असल्याने शे. रिहान हा फाटकाबाहेर थांबला. राष्ट्रगीत संपल्यानंतर शे. रेहान याने शाळेत प्रवेश करताच मुख्याध्यापक मुजाहिद यांनी त्याला थांबण्यास सांगून शाळेत उशिरा येण्याचे कारण विचारले. उशिरा आल्याबद्दल रेहानकडून शाळेतील शौचालय स्वत: उभे राहून स्वच्छ करून घेतले. सदर प्रकार विद्यार्थ्याने आपल्या पालकाजवळ कथन केल्यानंतर त्याचे वडील शे. उस्मान यांनी या प्रकाराबाबत मुख्याध्यापक मुजाहिद यांना विचारणा केली असता, विद्यार्थ्यांंनी शाळेत उशिरा येऊ नये, याकरिता शिक्षा केल्याचे सांगितले. शौचालय साफ करून घेतल्याने रेहानची प्रकृती ढासळली असून, त्याला तापसुद्धा आला आहे. यामुळे सदर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी मुख्याध्यापकास सेवेतून निलंबित करण्याची मागणी शे.उस्मान शे.दाऊद यांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जिल्हाधिकारी बुलडाणा, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, मुख्याधिकारी न.पा. लोणार, तहसीलदार लोणार, प्रधान सचिव शालेय शिक्षण मुंबई यांच्याकडे केली आहे. न.पा. उर्दू पूर्व माध्यमिक शाळा लग्न समारंभासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येते. यावेळी शाळेतील शौचालयाचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. हे शौचालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांंकडून स्वच्छ करून घेणे कितपत योग्य आहे?- शे.उस्मान शे.दाऊदपालक, लोणार झालेल्या गंभीर प्रकाराबाबत चौकशीचा आदेश दिला असून, विद्यार्थ्याकडून शौचालय स्वच्छ करून घेतल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.- विजय लोहकरेमुख्याधिकारी न.पा. लोणार