ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11- पावसामुळे अहमदाबादकडून नागपूरमार्गे जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या ११ तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुममध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे.पावसामुळे अहमदाबादवरून नागपूरमार्गे पुरी, हावडा, रामेश्वरम, बेंगळुरू, पाँडेचरी येथे जाणाऱ्या रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा धावत आहेत. दरम्यान उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यात गाडी क्रमांक १२८४४ अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस ११ तास, १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस अनिश्चित कालावधीसाठी उशिराने धावत आहे. रेल्वेगाडी क्रमांक ११४५३ अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्स्प्रेस ११ तास, रेल्वेगाडी क्रमांक १५१२० मंडुअधीह-रामेश्वरम एक्स्प्रेस दोन तास, रेल्वेगाडी क्रमांक १२२९६ पाटलीपुत्र-बेंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस तीन तास आणि २२४०४ नवी दिल्ली-पाँडेचेरी एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा धावत आहे. उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसण्याची वेळ आली आहे. दरम्यान रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुममध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
पावसामुळे रेल्वेगाड्या ११ तास लेट
By admin | Published: July 11, 2016 9:11 PM