शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

‘हैदरखान’ बनली लातूरकरांची जीवनदायिनी

By admin | Published: April 19, 2016 7:44 PM

मिरजेतील रेल्वे स्थानकाला सव्वाशे वर्षांहून अधिक काळ पाणीपुरवठा करणाऱ्या ४३३ वर्षांच्या हैदरखान विहिरीने ऐतिहासिक वारशाची परंपरा आजही जपली आहे. लातूरला रेल्वेने पाणी पुरविण्याची

- शरद जाधव,  सांगली

मिरजेतील रेल्वे स्थानकाला सव्वाशे वर्षांहून अधिक काळ पाणीपुरवठा करणाऱ्या ४३३ वर्षांच्या हैदरखान विहिरीने ऐतिहासिक वारशाची परंपरा आजही जपली आहे. लातूरला रेल्वेने पाणी पुरविण्याची योजना प्रत्यक्षात उतरल्यानंतर तर या विहिरीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या विहिरीमुळेच टँकरने पाणी पाठवण्यात सुलभता आली आहे. झाडाझुडपात हरवलेल्या या विहिरीची स्वच्छता पूर्ण झाल्याने सोमवारी तिचे भव्य रूप पाहायला मिळाले. पाणीटंचाईने व्याकूळ झालेल्या लातूर शहराची तहान भागविण्याचे औदार्य सांगली-मिरजकरांनी दाखविले आणि राज्यभरातून या दातृत्वाचे कौतुक होऊ लागले. लातूरला दिवसाआड २५ लाख लिटर पाणी पुरविण्याची क्षमता असलेला प्रकल्पही आता अंतिम टप्प्यात आला आहे. या भागातील नैसर्गिक बाबींमुळे लातूरला पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला. यात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका सध्या बजावत आहे, ती हैदरखान विहीर. याच विहिरीतून वाघिणींमध्ये पाणी भरण्यासाठी जात असल्याने तिचे महत्त्व दिसून येते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मिरजेत आदिलशहाचा सरदार हैदरखान याने १५८३ ला ही विहीर बांधली. त्यावेळी तिच्या पाण्याचा वापर प्रामुख्याने शेतीसाठी होऊ लागला. याचदरम्यान या विहिरीतून मिरजेतील प्रसिध्द दर्गा परिसरात असलेल्या कारंजासाठी पाणी पुरविण्यात येत असल्याच्या ऐतिहासिक नोंदी सापडतात. कारंजापर्यंत पाणी नेण्यासाठी दगडी नळांचा वापर करण्यात येत असे. या विहिरीला हत्तीची मोट होती. आदिलशाहीच्या काळातील वास्तुकलेचा आदर्श नमुना म्हणूनही या विहिरीकडे पाहिले जाते. कालांतराने ही विहीर मिरज संस्थानच्या ताब्यात गेली. मिरजेत रेल्वे स्थानकाची उभारणी झाल्यानंतर १८८७ मध्ये ही विहीर रेल्वेने ताब्यात घेतली. कारण ती रेल्वेस्थानक परिसरातच आहे. तेव्हापासून मिरजेतून देशभर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये या विहिरीचेच पाणी भरले जाऊ लागले. तब्बल ३२ लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या विहिरीची लांबी ५० फूट आणि रुंदी ७० फूट आहे. सगळे बांधकाम दगडी आहे. अनेक नैसर्गिक झरे असल्याने ती पूर्ण आटल्याचे ऐकिवात अथवा बघण्यात नाही. अगदी १९७२ च्या भयानक दुष्काळातही या विहिरीचा तळ कोणी पाहिला नसल्याचे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. विहिरीला सुरुवातीला तीन कमानी होत्या मात्र, त्यातील एक पडल्याने सध्या दोन कमानी अस्तित्वात आहेत.ऐतिहासिक कागदपत्रे : कुमठेकर संग्रहालयातया विहिरीवर पारशी भाषेत लिहिलेला शिलालेख असून, अलीकडच्या काळात कठड्याचे काम करण्यात आले आहे. मिरजेतील इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहालयात या विहिरीची माहिती देणारी ऐतिहासिक कागदपत्रे, नकाशे उपलब्ध आहेत.ऐतिहासिक ठेव्याची जपणूकसध्या मिरज स्थानकातून रोज ५७ रेल्वेगाड्यांची ये-जा होत असते. या सर्व गाड्यांसाठी पाण्याची सोय याच विहिरीतून केली जात असे. मात्र रेल्वेने स्वत:ची साडेचार किलोमीटर जलवाहिनी टाकून पाणीयोजना राबविल्यानंतर या विहिरीकडे दुर्लक्ष झाले होते. तथापि काहीवेळा त्या योजनेत अडचण आल्यावर या विहिरीचाच आधार असतो. आता लातूरला रेल्वेच्या वाघिणींमधून पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्या जलवाहिनीद्वारे या विहिरीत पाणीसाठा करण्यात येणार आहे आणि ते पाणी उचलून दररोज वाघिणींमध्ये भरले जाणार आहे. त्यासाठी विहिरीची स्वच्छता करत साठलेले पाणी काढण्याचे काम सध्या सुरू आहे. ते मंगळवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. लातूरला पाणीपुरवठा करण्यात हैदरखान विहीर उपयोगी ठरत असल्याने, प्रशासनानेही या ऐतिहासिक ठेव्याची जपणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.