शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

भरधाव कार चालवणाऱ्याला दिली समज; चालकाने मागून येऊन बाईकस्वाराच्या कुटुंबालाच उडवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 3:45 PM

लातूरमध्ये गाडी हळू चालवण्याची विनंती करणाऱ्या दुचाकीस्वाराला कार चालकाने धडक दिल्याची घटना घडली.

Latur Accident : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मद्यपान करुन भरधाव वेगात गाडी चालवल्यामुळे अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. लातूरमध्येही एका मद्यपीने बाईकला दिलेल्या धडकेमुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आहे. गाडी हळू चालव सांगितल्याचा राग आल्याने मद्यपान केलेल्या कार चालकाने रागाच्या भरात बाईकवरुन जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये माय लेकीचा समावेश आहे. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी कारमधील पाच जणांना अटक केली आहे.

लातूरच्या औसा तालुक्यात महामार्गावर एका कार चालकाने आधी बेदरकारपणे गाडी चालवून बाईकवरुन जाणाऱ्या कुटुंबाला जोरदार धडक दिली. बाईक चालकाने वेगात कार चालवायला विरोध केला असता कार चालकाने त्याला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार व त्याचा मुलगा गंभीर जखमी झाले. तर पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

२९ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता सादिक शेख हे पत्नी व दोन मुलांसह लातूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मागून एक कार येत होती, ज्याचा चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता. बेदरकारपणे गाडी चालवत त्याने सादिक शेखला कट मारला आणि पुढे निघून गेला. कार चालक  रस्त्यावरील वाहनांना कट मारत, शिवीगाळ करत, आरडाओरडा करत कार वेडीवाकडी चालवत होता. यावेळी सादिक शेख यांनी कारलाचकाला गाठलं आणि थोडं सांभाळून कार चालवा असं सांगितलं. यावेळी सादिक यांची कारमधील चार-पाच जणांसोबत बाचाबाची झाली.

यानंतर कार चालकाने सादिक यांना पुढे जाऊ दिले आणि स्वत: काही वेळ महामार्गावर उभा राहिला. सादिक महामार्गावरून काही अंतरावर गेला असता मागून रागाच्या भरात आलेल्या चारचाकी चालकाने सादिक यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. त्यामुळे सादिक यांची पत्नी इकरा शेख आणि ६ वर्षांची मुलगी नादिया शेख यांचा मृत्यू झाला. तर सादिक आणि त्यांचा मुलगा अहाद शेख जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी सादिक आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. तर सादिकच्या पत्नीचा आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याबाबत माहिती देताना औसा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील राजितवाड यांनी सांगितले की, ही घटना २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तपास करत असताना आम्ही चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या दिगंबर पाटोळे, कृष्णा वाघे, बसवराज धोत्रे, मनोज माने, मुदामे या ५ आरोपींविरुद्ध औसा शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातPoliceपोलिस