लातूर : हमीभावाच्या प्रस्तावित कायद्यास विरोध दर्शवीत शेतमाल खरेदीदारांनी बेमुदत बंद पुकारला आहे़ जिल्ह्यातील काही बाजारपेठा सुरू झाल्या तरी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत ११ दिवस शुकशुकाटच आहे़ जवळपास ३५ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे़ पोळ्याचा सण तोंडावर असताना शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली.लातुरातील बाजार समितीतील व्यापाºयांनी बंदमध्ये सहभागी होत शेतमालाचा सौदा पुकारणे बंद केले आहे़ जिल्ह्यासह परजिल्ह्यातील कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतील शेतमालाची या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होते़आज पुन्हा बैठकजिल्ह्यातील काही बाजारपेठा सुरू आहेत़ येथील बाजारपेठ सुरू करण्यास आम्ही खरेदीदारांच्या तीन-चारदा बैठका घेतल्या़ शुक्रवारी पुन्हा व्यापाºयांची बैठक घेणार आहोत. त्यातून तोडगा निघेल, असे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, सचिव नंदू गायकवाड म्हणाले.
लातूर बाजार समिती ११ दिवसांपासून ठप्प; ३५ कोटींची उलाढाल थांबली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 1:10 AM