शाहू महाविद्यालयाचा देवेश राज्यात पहिला तर विपुल दुसरा
पुणो / लातूर : एमबीबीएस आणि डेन्टलच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्यात घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत (एमएच-सीईटी) लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील देवेश शिळीमकर हा विद्यार्थी 678़2 गुण घेऊन राज्यात प्रथम, तर विपुल जाजू 666़2 गुण मिळवून द्वितीय आला आह़े याशिवाय याच महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यानी एसटी, व्हीजे व एनटी या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला़
वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत 8 मे रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री उशिरा संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मेडिकल, डेन्टल अभ्यासक्रमासाठी 7 हजार 5क्6 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. राज्यातील 39क् परीक्षा केंद्रांवर 1 लाख 48 हजार 349 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 65 हजार 6क्7 मुले आणि 82 हजार 787 विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली होती. यापैकी मेडिकल, डेन्टल अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गातून 4 हजार 111 आणि राखीव कोटय़ातून 3 हजार 395 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एनटी-3 या प्रवर्गातून लातूरच्या शाहू महाविद्यालयाचा गोविंद आदिनाथ सानप याने 66क् गुण संपादित करीत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. वैभव चन्नप्पा पवार 57क़्2 गुण मिळवून व्हीजेएनटी प्रवर्गातून राज्यात प्रथम, राणी विठ्ठल पुजरवाड 531 गुण संपादन करीत एसटी प्रवर्गातून राज्यात प्रथम आली आह़े तर एनटी-3 प्रवर्गातून सुभांगी नारायणराव फड (691़2) व सुशील सूर्यकांत गीते (562) यांनी राज्यातून अनुक्रमे द्वितीय व चतुर्थ क्रमांक मिळविला आह़े गुणपडताळणी करण्यासाठी विद्याथ्र्याना 6 ते 9 जून या काळात अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर 1क् जून रोजी संचालनालयाच्या संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. जूनच्या दुस:या आठवडय़ात विद्याथ्र्याकडून 4 केंद्रांवर प्राधान्य अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
नोबेल मिळवायचेय - देवेश
राज्यात पहिला आलेल्या देवेशची महत्त्वाकांक्षा उत्तुंग आहे. देवेशला वैद्यकीय क्षेत्रत संशोधन करून नोबेल पारितोषिक मिळवायचेय. वडील तुलशिदास व आई तारका शिळीमकर यांनी महाविद्यालयात येऊन आनंद व्यक्त केला.
मेडिसीन रिसर्चरमध्ये
करिअर करायचे आहे
बारावीपेक्षा मी सीईटीत चांगले गुण मिळविण्यास अधिक लक्ष केंद्रित केले. माङया यशाचे श्रेय आई-वडिलांचे आहे. मला मेडिसीन रिसर्चरमध्ये करिअर करायचे आहे.
- विपुल जाजू (राज्यात दुसरा)
हृदयरोग तज्ज्ञ व्हायचेय
वैद्यकीय क्षेत्रत हृदयरोग तज्ज्ञ बनण्याचे ध्येय आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्रय} करणार आहे. या यशाचे श्रेय आई-वडिलांचे आहे.
- प्रबोधिनी गढरी
(मुंबई विभागातून मुलींमध्ये प्रथम)