- राजकुमार जोंधळे, लातूर
पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे हैराण झालेल्या लातूर जिल्ह्यात सत्तारभार्इंनी आपला जगावेगळा घोड्यांचा छंद जिवापाड जपला आहे. त्यांच्या तबेलात देश-विदेशातील २२ घोडे असून त्यावर ते महिनाकाठी तब्बल आठ लाखांवर खर्च करतात. अंबाजोगाई येथील अर्ध्या एकरावरील जागेत हा तबेला उभारला आहे. या तबेल्याच्या देखरेखीसाठी १५ नोकरांचा ताफाही दिमतीला आहे. अनेकजण लग्नसोहळ््यासाठी किंवा रेससाठी घोड्याचा व्यावसायिक वापर करतात. मात्र अब्दुलभार्इंनी केवळ छंद म्हणून हे घोडे पाळले आहेत. प्रत्येक घोड्यास दिवसातून एकवेळ अंघोळ घातली जाते. तर एकवेळ मालिश केली जाते. विशेष म्हणजे उन्हाची तीव्रता जाणवू नये यासाठी कुलर आणि पंख्यांची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक घोड्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यांच्या शरीरयष्टीवर लक्ष देण्यासाठी जाणकार नोकरांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळ आणि संध्याकाळ चंदी दिली जाते. यात पेंड, चना, गव्हाचा भुसा या पशुखाद्याचा समावेश आहे. पशुप्रदर्शनात अव्वल...राज्यभरातील पुणे, करमाळा, अकलूज, सारंगखेडा, परळी, नांदेड, माळेगाव यात्रा, लातूरची सिध्देश्वर यात्रा, सोलापूर गड्डा यात्रा आणि उस्मानाबाद येथील पशुप्रदर्शनात ‘राजधानी’ घोडीने चॅम्पियनशीप मिळविली आहे. तर अन्य तीन घोड्यांनी महाराष्ट्र केसरी पटकावले आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदर्शनात आणि स्पर्धेत अब्दुलसत्तारभाई खोरीवाले यांच्या घोड्यांचा सहभाग असतोच.राज्यस्तरीय कृषीउद्योग पुरस्काराने सन्मानित...शहरातील अंबाजोगाई रोडवर एकाच तबेल्यात तब्बल २२ घोडे पाहण्याची उत्तम संधी अब्दुल सत्तारभाई खोरीवाले यांनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी त्यांनी विविध जातींचे घोडे, घोडी ठेवल्या आहेत. त्यासाठी तब्बल आठ लाखांचा खर्चही ते करतात. ७५ एकर शेती असून, याच शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण दुग्ध व्यवसायही थाटला आहे. २०१५ साली सत्तारभार्इंना महात्मा फुले शिक्षक परिषदेने राज्यस्तरीय कृषीउद्योग पुरस्काराने सन्मानित केले आहे. छंद म्हणून त्यांनी या घोड्यांचे पालनपोषण गेल्या अनेक वर्षांपासून पदरमोड करुन केले आहे. मुळात माणसाला छंद असला की, हे सर्व घडते...असे अब्दुल सत्तारभाई खोरीवाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.४५ कुटुंबांना रोजगार... ७५ एकर शेती, २२ घोडे, ३० म्हशी आदीं व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांनी वार्षिक ७० हजारांचे ३० सालगडी ठेवले आहेत. यासह इतर १५ नोकर हे महिनेवारी वेतनावर ठेवले आहेत. त्यामुळे ४५ कुटुंबांना सत्तारभार्इंनी रोजगार दिला आहे.