लातूर : लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी मिरजेतील कृष्णेच्या पात्रातून रेल्वेच्या कोट्याचे पाच एमएलडी पाणी लातूरला उपलब्ध करुन दिले आहे. लातूरच्या पाण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणार असल्याची माहिती महसूल-मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारने गेले चार दिवस दररोज पाच लाख लिटर पाणी लातूरला पाठविले. आता दोन दिवसानंतर दररोज ५० लाख लिटर पाणी घेऊन रेल्वे येणार आहे. मराठवाड्यात सरकारने २,८५६ टँकर सुरु केले. सरकारने पहिल्यांदाच सप्टेंबरपासून चारा छावण्या सुरु केल्या. छावण्यांमध्ये ३ लाख ७२ हजार ८८१ जनावरे आहेत, असे ते म्हणाले. पाण्याची टंचाई रोखण्यासाठी विंधन विहीरीला २०० फुटाला मान्यता होती. परंतु पाणी लागत नसल्याने आणखी दीडशे फूट परवानगी वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडवू - खडसे
By admin | Published: April 16, 2016 2:27 AM