पुणो : ती. पाळण्याची दोरी सांभाळत जगाचा उद्धार करणारी.. कर्तृत्वाने, कर्तबगारीने जगालाही थक्क करणारी ..जगाचे व्याप सांभाळतानाही संस्कृतीचा वसा मात्र तिने कधीच सोडला नाही. ती अथक राबते, पण तिचे ना कौतुक होते, ना गौरव. गणोशोत्सवानिमित्त ‘ती’च्या असीम कर्तृत्वालाच सलाम करण्यासाठीचा अभिनव उपक्रम ‘लोकमत’च्या पुढाकाराने सुरू करण्यात आला. संपूर्णपणो महिलांचे व्यवस्थापन.. पौरोहित्यापासून प्रतिष्ठापनेर्पयत सगळ्याच गोष्टी महिलांनी करत शुक्रवारी ‘ती’चा गणपती या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
पुणो हे पुरोगामी शहर म्हणून ओळखले जाते. स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ येथेच रोवली गेली. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यानंतर महर्षी
कर्वे यांनी त्यांची परंपरा चालवली.
त्याच परंपरेचा वसा घेऊन
‘लोकमत सखी गणोश मंडळा’ची मुहूर्तमेढ आज रोवण्यात आली.
मंडळाच्या अध्यक्षपदी चित्र गावडे-सरसे यांची निवड झाली आह़े त्यांच्या या भावनेला प्रतिसाद म्हणून महापौर चंचला कोद्रे, ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, सहायक पोलीस आयुक्त स्वप्ना गोरे व माजी नगरसेविका शुभदा जोशी यावेळी उपस्थित होत्या. पहिली आरती त्यांच्याच हस्ते करण्यात आली. मालती जोशी आणि स्वाती शाळिग्राम यांनी पौरोहित्य केले.
‘लोकमत’ने पुरोगामित्वाच्या भूमिकेला
नेहमीच बळ दिले आहे. स्त्रीशक्तीची नव्याने ओळख निर्माण होण्याची गरज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणोशोत्सव हे परिवर्तनाच्या चळवळीचे माध्यम बनले आहे. ‘ती’चा गणपती या संकल्पनेतून संपूर्णपणो महिलांचे व्यवस्थापन असलेले देशातील पहिले सार्वजनिक गणोश मंडळ स्थापन झाले आहे. ‘लोकमत’च्या ‘आपले बाप्पा’ उपक्रमांतर्गत कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश सर्वत्र पोहोचवत असताना गणोशोत्सवाला ‘ती’चा गणपती नवीन झळाळी देईल, हा आमचा विश्वास आहे.
- आशू राजेंद्र दर्डा, अध्यक्षा, लोकमत सखी मंच
वैदिक काळात भारतीय स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रंत पुरुषांच्या बरोबरीने अधिकार प्राप्त होते. धार्मिक कार्यातसुद्धा त्या पुरुषांच्या बरोबरीने भाग घेत असत. पण,नंतरच्या काळात परिस्थिती बदलली. अनेक क्षेत्रंत त्यांना दुय्यम वागणूक मिळू लागली. ‘यत्र नार्चन्तु पुज्यते, रमन्ने तत्र देवत:’ म्हणणा:या देशात स्त्रीची स्थिती ‘अबला नारी हाय तुम्हारी यही कहानी, ऑँचल में है दूध, ऑँखो में पाणी’ अशी झाली. पण, आता पुन्हा परिस्थिती बदलू लागली आहे. स्त्री सशक्तीकरणाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहे. ‘लोकमत सखी मंचा’चा ‘ती’चा गणपती प्रकल्पसुद्धा त्याचा परिणाम आहे. ‘लोकमत सखी गणोश मंडळा’ला माङया हार्दिक शुभेच्छा!
- सुमित्र महाजन, लोकसभा अध्यक्षा