ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - गूगलने 'इनबॉक्स' या नावाने नवीन इमेल सर्विच लॉन्च केली असून ती जुन्या इमेलपेक्षा अधिक सोपी व उपयोगी आहे. सध्या ही सेवा सर्वांसाठी नसून गूगलने निमंत्रण (इन्वेटेशन ) पाठवलेल्यांनाच या सेवेचा उपयोग घेता येणार आहे. यासाठी गूगलने आपल्या अनेक यूजर्सना 'इनबॉक्स' इमेलचे निमंत्रण ( इन्वेटेशन ) पाठवले आहे.
याआधी जीमेलचा वापर करणा-यापैकी ज्यांना गूगलचे निमंत्रण (इन्वेटेशन ) मिळाले नाही त्यांनी जीमेल अकांउटवर जावून 'इनबॉक्स@गूगल.कॉम'वर जावून एक जीमेल पाठवायचा आहे. ही सेवा २००४पासून सुरू असलेल्या सेवेबरोबर दिली जात आहे. नवीन सेवा उपलब्ध असलेल्या ' इनबॉक्स' मध्ये जीमेलचे सर्व फिचर्स उपलब्ध असणार आहे. तसेच ही सेवा एंड्रॉएड स्मार्टफोन आणि आयफोन्सवर सुध्दा उपलब्ध करण्यात आली आहे. 'इनबॉक्स'मध्ये महत्वाचे अपडेट पाहायला मिळता येणार आहे. ऑनलाइन खरेदी केल्यास सामानांची डिलिव्हरी स्टेटस पाहता येणार असल्याचे गूगल कंपनीच्या एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे.