शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा शुभारंभ

By admin | Published: November 03, 2016 8:24 PM

राज्यात रोहयोच्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा शुभारंभ गुरुवारी रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. शिंदखेडा तालुक्यात ही योजना पथदर्शी

ऑनलाइन लोकमत

शिंदखेडा, दि. 03 - राज्यात रोहयोच्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा शुभारंभ गुरुवारी रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. शिंदखेडा तालुक्यात ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत दोन वर्षात १० हजार कोटी खर्चाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.शिंदखेडा येथे बिजासनी मंगल कार्यालयात योजनेच्या शुभारंभ प्रसंगी तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच, ग्रामसेवक आणि संपूर्ण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळाही घेण्यात आली. कार्यशाळेस जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे, अनिल सोनवणे, नरेगाचे उपायुक्त उदय पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी अरविंद अंतुर्लीकर, पंचायत समिती सभापती सुनंदा गिरासे, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जि.प.सदस्य कामराज निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे, तहसीलदार गायत्री सौंदाणे उपस्थित होते.राज्याच्या विधीमंडळ रोजगार हमी समितीने मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्याचे दौरे करुन त्याठिकाणी या योजनेची अंमलबजावणी कशी होते. त्याचा अभ्यास करुन नवीन कर्न्हजन्स योजना आम्ही तयार केली. ही योजना पूर्वीच्या योजनेपेक्षा लवचिक आहे. या योजनेमुये केंद्र सरकारकडून पाहिजे तेवढा पैसा राज्यातील जनतेला आणि ग्रामीण भागाला समृद्ध करण्यासाठी वापरता येणार आहे. नवीन ११ कलमी कार्यक्रमात वैयक्ति आणि सार्वजनिक लाभाची कामे घेता येणार आहेत. दोन वर्षात १ लाख ११ हजार १११ कामांचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. लक्षांकाच्या पुढे जाऊन देखील निधी देण्याची तयारी आमच्या विभागाची आहे.योजनेचा अंमलबजावणीचे वेळापत्रक- ७ नोव्हेंबर रोजी लाभार्थी निवडीसाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेण्यात येईल. ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, ग्रामपंचायतीकडे प्राप्त अर्ज तांत्रिक मान्यता देण्यासाठी पाठविणे, १५ ते २५ नोव्हेंबर दरम्यान तांत्रिक मान्यतेची कार्यवाही करण्यात येईल, २८ नोव्हेंबरला प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करणे, २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान छाननी समितीसमोर सादर करणे व मान्यता देणे, १ ते ३ डिसेंबर लाभार्थ्यांच्या यादीस जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांची मान्यता घेण्यात येईल. ५ ते ६ डिसेंबर पर्यंत प्रशासकीय मान्यता देणे, ७ ते १३ डिसेंबरपर्यंत कामांना सुरुवात करणे आणि ५ मार्चपर्यंत ११ कलम कार्यक्रमाची सर्व कामे पूर्ण करुन पूर्णत्वाचे प्रमाणपत्र आॅनलाईन उपलब्ध करुन देणे, असे योजनेच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक आहे.- समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, भूसंजीवन व्हर्मी कंपोस्टींग, भू - संजीवन नाडेप कंपोस्टींग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव व इतर समृद्ध जलसंधारण कामे, अंकुर रोपवाटिका, नंदनवन वृक्ष लागवड आणि संरक्षण ग्रामपंचायत सबलीकरण व समृद्ध ग्राम योजना अशी कामे घेण्यात येणार आहे.