शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

शेगाव येथे ‘श्रीं’च्या पुण्यतिथी सोहळय़ास प्रारंभ

By admin | Published: September 03, 2016 1:56 AM

मुख्य पुण्यतिथी सोहळा ६ सप्टेंबर रोजी.

शेगाव, दि. २ : श्री गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला शुक्रवारपासून श्री गणेश व वरुणयागाने प्रारंभ करण्यात आला. विश्‍वस्त त्रिकाळ यांच्या हस्ते पुजा करून यागास सकाळी १0 वा. प्रारंभ झाला. मुख्य पुण्यतिथी सोहळा ६ सप्टेंबर रोजी असून कार्यक्रमाची सांगता ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त २ ते ७ सप्टेंबरदरम्यान भरगच्च कार्यक्रम असून या उत्सव सोहळय़ात सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, रात्री ८ ते १0 किर्तन असे कार्यक्रम होणार आहे. या उत्सवासाठी शुक्रवारी ८ दिंड्यांचे आगमन झाले आहे तर उत्सवाच्या मुख्य दिवसापर्यंंत ७00 च्या वर भजनी दिंड्यांचे आगमन होईल. या सोहळय़ात हभप प्रमोदबुवा पानबुडे (श्री क्षेत्र आळंदी), रमेशबुवा आवारे (खापरवाडी), उमेशबुवा दशरथे (श्री क्षेत्र आळंदी), विष्णुबुवा कव्हळेकर (कव्हळा) यांचे किर्तन व प्रवचन होणार आहे. श्रींचा मुख्य पुण्यतिथी सोहळा मंगळवारी होणार आहे. मंगळवारी सकाळी १0 वा. यागाची पुर्णाहुती व अवभृतस्नान होईल. दुपारी २ वाजता श्रींची भव्य पालखीची गज अश्‍वासह नगर परिक्रमा निघेल. बुधवारी सकाळी हभप जगन्नाथबुवा म्हस्के यांचे काल्याचे किर्तन होईल व त्या नंतर दहीहंडी, गोपालकाला होणार आहे. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त संपुर्ण मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई सुध्दा करण्यात आली आहे. संस्थानच्या परिसरामध्ये भक्तांच्या सेवेसाठी हजारो सेवेकरी आपली सेवा देणार आहेत. उत्सव काळात शहरातील व मंदीर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यतिथी उत्सवदिनी ३ पोलीस निरीक्षक , ११ अतिरिक्त पोलीस उपनिरीक्षक, १0५ पोलीस कर्मचारी, २५ साध्या वेशातील पोलिस, २0 महिला पोलीस, २0 वाहतूक पोलीस व सीआरपीएफचे एक पथक तैनात करण्यात येणार आहे.