सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत येथील कर्णिकनगर परिसरात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आयुक्त विजयकुमार काळम यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. स्मार्ट सिटीचे राज्यभरात मार्केटिंग करून सोलापूरचा विकास साधला जाईल, अशी माहिती काळम यांनी दिली. स्वच्छ आणि सुंदर सोलापूर हे स्मार्ट सिटीचे व्हीजन असून, स्वच्छता अभियानास नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. महापालिकेचे लेटरपॅड बदलून, त्यावर स्मार्ट सिटीचा लोगो येईल, अशी माहिती देऊन विजयकुमार काळम यांनी स्मार्ट सिटीमध्ये हिरवाईला महत्त्व असून, प्रत्येक नागरिकांनी घरापुढे एक तरी झाड लावावे तसेच पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेऊन ते जगवावे असे आवाहन केले. शहरात एकमेव असलेल्या कर्णिकनगरातील चिल्ड्रन पार्क व जिजामाता उद्यानच्या नूतनीकरणास भेट देऊन आयुक्तांनी पाहणी केली.यावेळी महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
सोलापुरात ‘स्मार्ट सिटी’चा शुभारंभ
By admin | Published: February 03, 2016 3:28 AM