पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर येथील भाभा अणू संशोधन केंद्रात (बी.ए.आर.सी.) काम करण्यासाठी चारित्र्य वर्तणुकीचा दाखला (पीव्हीसी) मिळवण्या करीता कायदे धाब्यावर बसविण्यत येत असल्याने देशाच्या अति सवेंदनशील प्रकल्पाच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. हिन्दुस्थान कंस्ट्रक्शन कंपनी (एच.सी.सी.) तारापूर येथील बी.ए.आर.सी.च्या प्रकल्प आवारातील सुमारे दोनशे एकर जागेवर इंटिग्रेटेड न्यूक्लियर रिसायकल प्लांट (आय.एन.आर.पी.) उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून त्या करीता सुमारे एक ते दीड हजार कंत्राटी कामगार काम करीत आहेत. त्यामध्ये विविध राज्यातील कामगारांचा मोठ्या प्रमाणामध्ये भरणा आहे.सुरक्षिततेच्या दृष्टीने देशातील अणुऊर्जा केंद्र या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पात काम करण्या पूर्वी संबंधीत कामगारांना त्या जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयातून स्थानिक पोलीस स्थानकातर्फे पोलीस व्हेरीफिकेशन सर्टिफिकेट (पी.व्ही.सी.) घ्यावे लागते. ते देतांना त्या कामगाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भात माहिती त्याच्या मुळ गावातील पोलीस स्थानकातून मागवून नंतरच प्रमाणपत्र दिली जाते. त्या करीता मुळगावच्या पत्या सहित परिपूर्ण माहिती घ्यावी लागते.मात्र, हिंदुस्थान कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या कॉन्ट्रेक्टरनी त्यांच्या कामगारासाठी पी.व्ही.सी. मिळविण्यासाठी केलेल्या प्रतिज्ञा पत्रात राहण्याचा पत्ता चक्क तारापुर बीएआरसी साईटचा दिला आहे. वास्तविक पाहता ज्या प्रकल्पात कामा करीता प्रवेश मिळावा त्या करीता पी.व्ही.सी.ची गरज आहे. मग अगोदरच तेथे वास्तव्य कसे? हे सर्व चक्रवून टाकण्या सारखे तर आहेच परंतु त्याही पेक्षा दूसरी गंभीर बाब म्हणजे प्रतिज्ञा पत्र हे वैयक्तिक (सेल्फ) करायचे असते. येथे सामायिक म्हणजे ग्रुप प्रतिज्ञा पत्र पोलिसांना दिले आहे. विशेष म्हणजे तारापूर पोलिसांनीही ते स्विकारले आहे. >हा तर दोगलेपणा या उलट स्थानिक कामगार पी.व्ही.सी. घेताना त्यांना कायद्याच्या चौकटितून काटेकोर पणे जावे लागते. त्यामधे ते बसले नाहीत तर त्यांना नोकरीलाही मुकावे लागते. तर परप्रांतियांचे ग्र्रुप प्रतिज्ञापत्र तारापूर पोलिसांनीही ते कुठलाही आक्षेप न घेता स्विकारले आहे.
पीव्हीसीसाठी कायदे धाब्यावर
By admin | Published: July 12, 2017 3:06 AM