शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘लॉसह सीए’चे पेपर एकाच दिवशी

By admin | Published: April 04, 2017 6:07 AM

लॉच्या परीक्षांचा निकाल विद्यापीठाने उशिरा लावल्याने केटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी

मुंबई : लॉच्या परीक्षांचा निकाल विद्यापीठाने उशिरा लावल्याने केटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून विद्यापीठाने केटी परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठेवली. त्यामुळे मेपर्यंत चालणारी ही परीक्षा आणि सीएच्या परीक्षांचे पेपर एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. पण प्रत्येक वेळी विद्यापीठात होणाऱ्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. ५ एप्रिलपासून लॉची केटी परीक्षा घेण्यात येणार होती. पण आता ही परीक्षा २७ एप्रिल ते ८ मे दरम्यान घेण्यात येणार आहे. तर सीएची परीक्षा २ ते १७ मे या दरम्यान होईल. २, ४ आणि ८ मे असे तीन दिवस लॉ व सीएचे पेपर एकाच दिवशी आहेत. सीएचा एफआर हा पेपर २ मे रोजी असून त्याच दिवशी लॉचा काँट्रॅक्ट पेपर आहे. सीएचा ४ मे रोजी एफएमचा पेपर असून लॉचा कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ पेपर आहे. ८ मे रोजी लॉचा लिगल लँग्वेजचा पेपर असून सीएचा लॉ या विषयाचा पेपर आहे. एकूण तीन पेपर एकाच दिवशी आहेत. दोन्ही परीक्षांचे शुल्क भरल्यामुळे तसेच अभ्यासासाठी कमी वेळ मिळणार असल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने लॉच्या फायनल परीक्षांनंतर केटी परीक्षा ठेवाव्यात. जेणेकरून सीएच्या परीक्षांमध्ये या परीक्षा येणार नाहीत आणि विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांचा अभ्यास करण्यास वेळ मिळेल, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)