मुंबई : वकिलांनी संपावर जाऊ नये आणि संपावर गेल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याबाबत ‘अॅडव्होकेट अॅक्ट, १९६१’ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव लॉ कमिशनने सरकारपुढे ठेवला आहे. याविरुद्ध ‘बार कौन्सिल आॅफ इंडिया’ने ३१ मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. याला ‘बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवा’ ने समर्थन दिले आहे. त्यामुळे ३१ मार्च रोजी राज्यातील न्यायालयांचे कामकाज ठप्प होणार आहे.कायद्यातील प्रस्तावित सुधारणेमुळे वकिली व्यवसायाचा आणि विधी शिक्षणाचे नियंत्रण या व्यवसायात नसलेल्या लोकांकडे देण्यात येणार आहे. वकिलांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार या लोकांना असणार आहे. वकील संपावर गेल्यास त्याला दंड ठोठावण्याचा आणि त्याचा परवाना रद्द करण्याचा अधिकारही संबंधित लोकांना असणार आहे. त्यामुळे प्रस्तावित सुधारणा अन्यायकारी, लोकशाहीशी विसंगत असल्याने बीसीआयने सर्व राज्यांच्या बार कौन्सिलला संप पुकारण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)
३१ मार्चला वकिलांचा संप
By admin | Published: March 29, 2017 3:58 AM