शहरं
Join us  
Trending Stories
1
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
2
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
3
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
4
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
5
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
6
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
7
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
8
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
9
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
10
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
11
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
12
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
13
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
14
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा
15
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
16
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
17
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
18
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
19
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
20
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 10:07 PM

Laxman Hake : लक्ष्मण हाके एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी येथे आले असता हल्ला करण्यात आला.

Laxman Hake :नांदेडमधून एक मोठी बातमी समोर आली आली आहे. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला झाला आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बाचोटीमध्ये ही घटना घडली असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत हाके यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्यावर यापूर्वी पुण्यातही हल्ला झाला होता.

सविस्तर माहिती अशी की, लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन सुरनर यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके आले  होते. प्रचारसभा संपवून परत जाताना बाचोटी येथे हा प्रकार घडला. शंभर ते दीडशे तरुणांचा जमाव होता, पहिल्यांदा गाडीच्या बोनेटवर चढले आणि त्यानंतर गाडीच्या मागच्या बाजूच्या काचा फोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली. हल्ला करणाऱ्यांच्या हातामध्ये काळे झेंडे होते. हल्लेखोर एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगेंच्या नावाच्या घोषणा दिल्या, असेही लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

यावेळी ओबीसी आंदोलकदेखील आक्रमक झाले, त्यांनीही घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या करून घोषणा दिल्या. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद शमवला, अशी माहिती आहे.

या हल्ल्यानंतर हाकेंनी प्रतिक्रिया दिली. 'आम्ही लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आलो होतो. बाचोटीतून आमच्या गाड्यांचा ताफा चालला होता, त्यावेळी 100 ते 150 तरुणांच्या गटाने लाठ्याकाठ्या घेऊन आमच्या कारवर हल्ला केला. हा हल्ला भ्याड आणि जीवघेणा हल्ला असल्याचं म्हटलं. आमचा जीव घेऊन कुणाचं ध्येय साध्य करायचं असेल तर तयार आहोत, असं हाके म्हणाले.  आमने सामने यायची हल्लेखोरांमध्ये धमक नाही. यांच्यात समोरासमोर येऊन लढायचा दम नाही. बाचोटी गावातील तरुण होते, त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. जरांगेंच्या नावानं घोषणा देत होते. आता निवडणुकीतून माघार घ्यायची का? उद्या आम्हाला मतदानाला बाहेर पडू दिलं जाणार की नाही?' असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, 'कंधार तालुक्यातील पोलिसांना माहिती देऊन वाय दर्जाची सुरक्षा असूनही एक कॉन्स्टेबल नव्हता, असं लक्ष्मण हाके म्हणाले. लातूरमध्ये पोलिसांनी संरक्षण दिले होते, नांदेडमध्ये एकही पोलीस संरक्षणाला नव्हता. आमच्या गाड्या त्या गावातून पास होत असताना गाड्या अडवण्यात आल्या. उद्या कंधार पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार आहोत. हल्लेखोरांना अटक होईपर्यंत कंधार पोलीस स्टेशनजवळ ठिय्या आंदोलन करणार आहोत', असे लक्ष्मण हाके म्हणाले.

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेOBC Reservationओबीसी आरक्षणNandedनांदेडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण