'दादा, काळजी करू नका'; अजित पवारांनी सांगितला शिंदे-फडणवीसांसोबतचा कॉलचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:20 PM2023-01-31T17:20:43+5:302023-01-31T17:21:11+5:30

आमचं 'सर्वसामान्यांचे सरकार' बोलणं मात्र कुठेही महागाई कमी करण्याचा, कारखाने बाहेर गेले ते परत येण्याकरिता प्रयत्न होत नाहीत असं अजित पवार म्हणाले.

Leader of Opposition Ajit Pawar targeted CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis | 'दादा, काळजी करू नका'; अजित पवारांनी सांगितला शिंदे-फडणवीसांसोबतचा कॉलचा किस्सा

'दादा, काळजी करू नका'; अजित पवारांनी सांगितला शिंदे-फडणवीसांसोबतचा कॉलचा किस्सा

googlenewsNext

मुंबई - हे सरकार गोरगरीबांचे नाही. मी कामासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागतो त्यावेळी कॉल केल्यानंतर 'दादा देऊ, काही काळजी करू नका' लवकरच देऊ. दोघेही पॉझिटिव्ह बोलतात निगेटिव्ह अजिबात बोलत नाही. कुठलं काम आहे काय आहे विचारतात मात्र वेळ काही मिळत नाही. त्या दोघांचे काय सुरू आहे माहित नाही. त्यांचे त्यांनाच माहीत. आम्हाला नुसतं खेळवतायत की फक्त चालढकल करत आहेत की वेळ मारुन नेतायत हे कळायला मार्ग नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा किस्सा सांगितला आहे. 

अजित पवार म्हणाले की, कुणी वेळ मागितला तर वेळ द्यायचा असतो. सत्तेवर नसताना सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बोलणं सोपं असतं पण सरकारमध्ये आल्यानंतर त्या निर्णयाबद्दलचा फायनल निर्णय घेऊन पुढे मार्ग काढणे ही तारेवरची कसरत असते. परंतु तसे काम करताना हे सरकार पाहायला मिळत नाही. आमचं 'सर्वसामान्यांचे सरकार' बोलणं मात्र कुठेही महागाई कमी करण्याचा, कारखाने बाहेर गेले ते परत येण्याकरिता प्रयत्न होत नाहीत. उलट बाहेरचे मुख्यमंत्री येतात इथल्या उद्योगपतींना, बॉलिवूड आणि वेगवेगळ्या क्षेत्रांना तुम्ही आमच्याकडे चला बोलतात. तरीही आमचे 'सर्वसामान्यांचे सरकार 'सुरू आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला. 

त्याचसोबत महापुरुषांबद्दल सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. त्यातून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि महत्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी आणि आताच्या कायदा व सुव्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न या समस्या असतील या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. वास्तविक अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत यासाठी सरकारने एक नवीन धोरण किंवा नवीन कायदा करावा अशी मागणी करणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

बागेश्वर बाबावर कारवाई करा
बागेश्वर बाबा कोण आहे. त्याने संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून अपमान केला आहे हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राज्यात वारकरी संप्रदायाचे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. या वक्तव्याचा निषेध करतानाच अशा बाबांवर राज्यसरकारने कारवाई करावी अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली.

Web Title: Leader of Opposition Ajit Pawar targeted CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.