शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

नेते एकीकडे; समर्थक दुसरीकडे!---भाऊबंदकीचे पेटले राजकारण

By admin | Published: June 12, 2015 9:37 PM

कऱ्हाडात घडलंय-बिघडलंय : उंडाळकरांची व्यूहरचना की कार्यकर्तेच ऐकेनात ? इस्लामपूर : जयंतरावांची चाणक्य नीती

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  --विधानसभेतील पराभवानंतर कऱ्हाड दक्षिणेत विलासराव पाटील-उंडाळकर व सुरेश भोसले गटांत पुन्हा मैत्रिपर्व सुरू झालंय म्हणे! ‘अतुल’ अन् ‘उदय’ या युवा नेत्यांनी तर परस्परांना जयवंत शुगरची साखर अन् कोयनेचे पेढे भरवून गोड संदेश दिला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय पाटलांनी संवाद मेळावा घेत कार्यकर्त्यांना सूचना केल्या. तर काकांनी भोसलेंना बिनशर्त पाठिंबाही दिला; पण पाठिंबा एकीकडे अन् समर्थकांच्या उमेदवाऱ्या दुसरीकडे, असे चित्र पाहायला मिळत असून, ही उंडाळकरांची राजकीय व्यूहरचना की कार्यकर्ते ऐकेनात? याबाबत उलट सुलट चर्चेला ऊत आलाय.कऱ्हाड दक्षिणेतील राजकीय संदर्भ बदलत आहेत. विधानसभा निवडणुकीत ३५ वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या विलासराव पाटील-उंडाळकर व भाजपचे डॉॅ. अतुल भोसले यांना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून पराभव पत्करावा लागला. मतविभाजनाचा धोका लक्षात घेऊन उंडाळकर-भोसले नेते पुन्हा एकत्र आलेत; पण त्यांचे मनोमिलन उंडाळकर समर्थकांच्या पचनी पडल्याचे दिसत नाही. ‘कृष्णे’च्या निवडणुकीत उंंडाळकरांनी भोसलेंना बिनशर्त पाठिंबा दिला असताना त्यांचे जवळचे अनेक शिलेदार अविनाश मोहितेंच्या संस्थापक पॅनेलचे चक्क उमेदवारच आहेत. कोयना बँकेच्या संचालिका डॉ. उमा अजित देसाई, उंडाळकर समर्थक कृष्णेचे संचालक जयशंकर यादव, पांडुरंग पाटील, अशोक जगताप, सर्जेराव लोकरे यांच्यासह संदीप पवार, राजेश जाधव यांनी नेत्यांचे आदेश धाब्यावर बसविले आहेत. विधानसभेला उंडाळकरांच्या व्यासपीठावर धडाडणाऱ्या बाळासाहेब शेरेकर ‘रयत’ कारखान्याचे संचालक अशोकराव थोरात, अ‍ॅड. रवींद्र पवार या तोफाही संस्थापक पॅनेलच्या धडधडत आहेत. उलट भोसलेंच्या सहकार पॅनेलमध्ये बाबूराव यादव, संभाजी पाटील हे दोन उंडाळकरांचे उमेदवार दिसत आहेत. तर जगन्नाथ मोहिते, शिवाजीराव जाधव, धनाजी काटकर, हणमंतराव चव्हाण आदी उंडाळकर समर्थक सहकार पॅनेलच्या व्यासपीठावर दिसत आहेत. त्यामुळे निष्ठावंत उंडाळकर समर्थकांत दुफळी निर्माण झालेली दिसते. पण उंडाळकर पिता-पुत्रांनी भोसले यांना जाहीर पाठिंबा देऊ केलाय.संवाद पचला की नाही ?अ‍ॅड. उदय पाटील यांनी गत महिन्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर मलकापुरात युवा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला. यावेळी माझ्यावर झालेल्या अन्यायाचा ‘कृष्णे’च्या निवडणुकीत लोकशाही मार्गाने बदला घ्या. डॉ. अतुल भोसलेंच्या सहकार पॅनेलला मदत करा, असे भावनिक आवाहन केले; पण त्यांचा हा संवाद कार्यकर्त्यांना किती पचला, हे निकालानंतरच समजेल..अविनाश मोहितेंशी फारकत का ?कृष्णेच्या गत निवडणुकीत संस्थापक पॅनेलना पाठिंबा देत अविनाश मोहितेंना सत्तेवर बसवायला उंडाळकरांचाही हातभार होता; पण पाच वर्षांत असे काय बिघडले की त्याच उंडाळकरांनी आज अविनाश मोहितेंना सोडून भोसलेंना बिनशर्त पाठिंबा देऊ केलाय? याचीही चर्चा सुरू झालीय.ही तर म्हणे गाजर हलव्याची गोष्ट !‘उंडाळकरांचा कार्यकर्ता’ ही तर त्यांची निष्ठावंत सेना आहे. नेत्यांचा शब्द ही सेना प्रमाण मानते तेव्हा ‘तुम्ही काळजी करू नका. उंडाळकरांचा पाठिंबा आपल्यालाच आहे,’ असे एक पैलवान सहकार पॅनेलच्या व्यासपीठावरून सांगत आहे. पण, त्यांचं हे बोलणं म्हणजे ते सांगतात की ‘गाजर हलव्याची’ गोष्टच असल्याची चर्चा आहे.चर्चा तर होणारच...गावातल्या पुढाऱ्यांचे निवडणुकीमध्येच ‘दर्शन’प्रत्येक कार्यक्रमासाठी एखादी विशेष व्यक्ती ही प्रत्येक गावात ठरलेली असते; मग तो कुणाला शेवटी घालवण्याचा कार्यक्रम असो की, अगदी लग्नकार्याचा. याप्रमाणे निवडणुकीतही अशीच एक व्यक्ती ठरलेली असते. ती म्हणजे ‘गावचा पुढारी’ होय. या पुढारी व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एक वर्षातून काही महत्त्वाच्या कार्यक्रमांवेळीच दर्शन देतात. तो म्हणजे ‘निवडणूक कार्यक्रम’ होय. सध्या ‘कृष्णा’ कारखाना निवडणूक असल्याने कारखाना निवडणुकीसाठी हे ‘अदृश्य’ असलेले ‘पुढारी’ प्रत्येक गावागावात ‘प्रकट’ झाले आहेत. गढुळाचं पाणी झालं ‘कृष्णेचं’ पाणी !गावोगावी तिन्ही पॅनेलकडून अनेक चित्रपटांतील गाण्यांचे डबिंग करून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. एका पॅनेलने तर चक्क ‘गढुळाचं पाणी कशाला ढवळलं...’ असे आहे हेच गाणे डबिंग करून ‘कृ ष्णेचं पाणी कुणी गढूळ केलं....’ असे गाणे तयार केले आहे. भाऊबंदकीचे पेटले राजकारणइस्लामपूर : जयंतरावांची चाणक्य नीती अशोक पाटील- इस्लामपूरइस्लामपूरची पांढरी बाहेरच्यांना धार्जीण असल्याचे उरुण परिसरात समजले जाते. त्यामुळेच मूळचे कासेगावचे सुपुत्र, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची इस्लामपूर शहरात हुकूमत आहे. उरुण परिसरातील सर्वच पाटील भावकी-घराणी जयंत पाटील यांच्या पाठीशी आहेत. या निवडणुकीत मात्र तिन्ही गटाच्या नेत्यांनी उरुण परिसरातील पाटील घराण्यांमध्ये उमेदवारी देऊन भाऊबंदकीचे राजकारण पेटवले आहे.युवराज पाटील (नाना) यांना अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलने उमेदवारी दिली आहे. पाटील हे मानाजी पाटील घराण्यातील आहेत. हे घराणे म्हणजे उरुण परिसरात सर्वात मोठा बुडका मानला जातो. इस्लामपूर पालिकेचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. उरुण येथील विद्यमान नगरसेवक चंद्रकांत पाटील यांना डॉ. इंद्रजित मोहिते व मदन मोहिते यांच्या रयत पॅनेलमधून उमेदवारी दिली आहे. ते माजी ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांच्या गटाचे असले तरी, जयंत पाटील यांचे नेतृत्व ते मानतात. पोलीसपाटील भावकीतील हे उमेदवार माळकरी आहेत. पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचे चुलत बंधू संजय पाटील यंदा डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलमधून नशीब अजमावत आहेत. ते तुळाजी पाटील या घराण्यातील आहेत. राजारामबापू कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील आणि स्वीकृत नगरसेवक शहाजीबापू पाटील यांचे ते बंधू आहेत. जयंतरावांची भूमिका गुलदस्त्यातआमदार जयंत पाटील यांनी तिन्ही गटाच्या पॅनेल प्रमुखांना समान अंतरावर ठेवले आहे. तिन्ही नेते आपलेच आहेत, अशी भूमिका घेऊन, ‘तुम्ही तुमच्या उमेदवाराला मला भेटायला सांगा’, असा निरोप त्यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय? यावर कार्यकर्ते उलटसुलट चर्चा करत आहेत. ते परदेश दौऱ्यावर गेले आहेत, असेही काहीजण सांगत आहेत.डॉ. सुरेश भोसले यांचे मूळचे घराणे मोहित्यांचे असले तरी, ते उरुण परिसरातील पोलीसपाटील घराण्यात दत्तक आले आहेत. सहकार पॅनेलची उमेदवारी देताना तुळाजी पाटील घराण्यातील पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचे चुलत बंधू संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे.