मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदांसाठी तर ११८ पंचायत समित्यांसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळपासूनच अनेक सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी मताधिकार बजावला.यामध्ये अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी, रेखा, अभिनेते नाना पाटेकर, शाहरूख खान, सुनील बर्वे, रणबीर सिंग, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सोनम कपूर, श्रद्धा कपूर, अनुष्का शर्मा, सुप्रसिद्ध उद्योजक टीना अंबानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी मतदान केले. याशिवाय, अभिनेता भरत जाधव, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेता अतुल तोडणकर, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिनेत्री मयुरी देशमुख, अभिनेत्री मानसी कुलकर्णी, अभिनेता मिलिंद गुणाजी, अभिनेत्री राणी गुणाजी, अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री शर्वरी जेमनीस, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, अभिनेत्री आर्या आंबेकर, अभिनेत्री स्वाती चिटणीस, अभिनेत्री श्वेता मेहंदळे यांनीही मतदानाचे कर्तव्य बजाविले. अभिनेता आमीर खान, अभिनेता हृतिक रोशन, अभिनेत्री दिया मिर्झा यांसारखे अनेक सेलिब्रिटी केवळ आपल्या शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले. यात अभिनेता ऋषी कपूर हाँगकाँगमध्ये, अभिनेता अनुपम खेर केपटाउन येथे, अभिनेता अजय देवगण आणि इम्रान हाश्मी जोधपूरमध्ये आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात आहेत, तर अभिनेता संजय दत्त भोपाळला, अभिनेता अर्जुन कपूर आणि प्रियांका चोप्रा शूटिंगमध्ये असल्याने मतदानास येऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी)मंत्रीही उपस्थितकेंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, नेते शरद पवार यांनी मुंबईत आपली नात रेवती सुळे हिच्यासह मतदान केले. च्शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी, मनसे प्रमुख राज ठाकरे, खासदार पूनम महाजन, मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनी आपापल्या मतदारसंघात मतदान केले.
नेते, सेलिब्रिटींनीही बजावला मताधिकार!
By admin | Published: February 22, 2017 4:54 AM