शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

हौशे-गवशे-नवशे हैदराबाद फिरायला गेले; परतताच गौप्यस्फोट, 'आम्हाला फसवले', काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 11:16 IST

तेलंगणाला गेले पन्नास गावकारभारी; 'बीआरएस'मुळे दक्षिणमध्ये खळबळ : सुभाषबापूंचा टोमणा

राकेश कदम

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपचे काही सरंपच, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण ५२ सोमवारी हैदराबादेत बीआरएस पक्षात प्रवेश केला. परंतु, हा कार्यक्रम म्हणजे पक्षप्रवेश नव्हता. बीआरएसच्या सोलापुरातील नेत्यांनी आम्हाला फसवून पक्षप्रवेश घडवून आणला, असे स्पष्टीकरण येळेगावचे आज जाहीर स्पष्टीकरण देणार, उपसरपंचाकडे बोट सरपंच संजयकुमार लोणारी आणि इतरांनी 'लोकमत'ला दिले.

हैदराबादच्या विधानभवनात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण बीआरएसच्या सोशल मीडियावरील पेजवर उपलब्ध आहे. या कार्यक्रमाला हजर असलेले बहुतांश लोक सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आहेत. भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली परंतु आमचा पक्षप्रवेश झालेलाच नाही, असा दावा सरपंचांनी केला. त्यामुळे बीआरएसच्या नेत्यांची कोंडी झाली.

काय घडले हैदराबादेत?

हैदराबाद आणि परिसरातील गावांचा विकास कसा झाला याची माहिती घेऊया म्हणून नागेश वल्याळ आणि सचिन सोनटक्के ५२ जणांना हैदराबादेला घेऊन गेले. या दौयाचे नियोजन यलाळचे माजी सरपंच तुकाराम शेंडगे यांनी केले. येण्या-जाण्याचा, राहण्याचा, जेवणाचा खर्च बीआरएसच्या नेत्यांनीच केला. हैदराबादच्या विधानभवनात गेल्यानंतर पक्षप्रवेशाबद्दल माहिती दिली. अनेकांनी विरोध केल्यानंतर केवळ सत्काराचे फोटो काढूया. फोटो कुठेही पाठविणार नाही, असे आश्वासन सोनटक्के यांनी दिल्याचे सरपंचांनी 'लोकमत'ला सांगितले.

मी आणि सचिन सोनटक्के सर्वांनाच विश्वासात घेऊन हैदराबादला गेलो होता. आम्ही कुणालाही फसवले नाही. तिथे मुख्यमंत्र्यांसमोर या सर्वांचा पक्षप्रवेश होणार म्हणून जाहीर केले. ज्यांचा विरोध होता त्यांनी तिथेच विरोध करायला हवा होता. आता ही मंडळी कोणाच्या तरी दबावाखाली येउन पक्षप्रवेश केला नाही म्हणून सांगत आहेत. - नागेश वल्याळ, समन्वयक, भारत राष्ट्र समिती पक्ष.

सरपंचांकडील फोनही काढून घेत हो हैदराबादच्या विधान भवनात मुख्यमंत्री केसीआर यांना भेटण्यापूर्वी फोन काढून घेण्यात आले. सोनटक्के आणि वल्याळ यांनी अचानक पक्ष प्रवेशाची माहिती दिली. यावेळी अनेकजण कार्यक्रमातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर पडू दिले नाही. त्यामुळे नाईलाजस्तव गळ्यात बीआरएसचा पंचा घालून घेतल्याचे लोणारी व लवंगीचे माजी सरपंच गुरुनाथ कोटलगी म्हणाले.

बीआरएस प्रवेशावर काय म्हणाले, भाजप-काँग्रेसचे नेते

दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप सक्षम आहे. परंतु, लोकशाही आहे. काही हौसे, गवसे, नवसे लोक आहेत. त्यांना हैदराबाद बघायला मिळतंय या विचाराने काही लोक गेलेले असतात. तिथून मला फोन येतात मी तुमच्यासोबत आहे म्हणून. वाट बघत राहा. आमच्याकडून गेलेले लोक मतदानावेळी आमच्यासोबतच येतील - आमदार सुभाष देशमुख, भाजप

बीआरएस पक्षात प्रवेश करणारे काही लोक काँग्रेस पक्षाचेही आहेत. ही मंडळी कोणाच्या आमिषाला बळी पडून गेली हे आम्ही तपासणार आहोत. काही दिवसानंतर हे लोक लवकरच परत कॉंग्रेसमध्ये येतील - बाबा मिस्त्री, माजी नगरसेवक, काँग्रेस

आज जाहीर स्पष्टीकरण देणार, उपसरपंचाकडे बोट

गावडेवाडीचे माजी सरपंच सुखदेव गावडे, वांगीचे माजी सरपंच शामराव हांडे, बागीचे सरपंच संगप्पा कोळी, तेलगावचे सरपंच अप्पासाहेब कोळी, दिंडूरचे माजी सरपंच बसवराज मिरजे, सादेपूरचे सरपंच मलकारी व्हनमाने, तेरा चे माजी सरपंच अनंत देशमुख, कारकलचे सरपंच अमोगसिध्द देशमुख यांच्यासह २० ते २५ पदाधिकारी आज पत्रकार परिषद घेऊन बीआरएसमध्ये पक्ष प्रवेश झालाच नाही, याचे स्पष्टीकरण देणार असल्याचे येळेगावचे सरपंच संजयकुमार लोणारी यांनी सांगितले. यलाळचे माजी उपसरपंच तुकाराम शेंडगे यांनी याँ याचा समन्वय घडवून आणल्याचे सर्वांचे मत आहे.

टॅग्स :BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती