शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

नेत्यांच्या घरून काम चालणार नाही; भाजपची लोकसभा निवडणूक रणनीती ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 1:05 PM

लोकसभा निवडणुकीसाठीच्या सर्व हालचाली या पक्ष कार्यालयातून होतील. कोणत्याही नेत्याच्या घरून काम होणार नाही, असे पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी बजावले आहे. 

मुंबई : प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजपचे जनसंपर्क कार्यालय ३० जानेवारीपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर दहा-पंधरा दिवसांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क कार्यालय सुरू केले जाईल. लोकसभा निवडणुकीसाठीच्या सर्व हालचाली या पक्ष कार्यालयातून होतील. कोणत्याही नेत्याच्या घरून काम होणार नाही, असे पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी बजावले आहे. 

येथे नुकत्याच झालेल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सोशल मीडियाच्या वापरात भाजपचे नेते, कार्यकर्ता आणि एकूणच यंत्रणा कशी कमी पडत आहे यासंबंधीचे सादरीकरण करण्यात आले. अपेक्षेपेक्षा केवळ आठ टक्केच काम होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपपासून सर्व प्लॅटफॉर्मवर धडाक्यात काम सुरू करा, असे आदेश देण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वीच सोशल मीडियावर शंखनाद करा असे सांगण्यात आले. 

नवमतदारांची संमेलने- युवा मोर्चासह भाजपच्या राज्यात सात प्रमुख आघाड्या आहेत. या प्रत्येक आघाडीतर्फे किमान २५ हजार लोकांच्या उपस्थितीत दोन मेळावे घेण्यात येणार आहेत. या शिवाय नवमतदारांची संमेलने घेण्यात येतील. अल्पसंख्याक मतदारांमध्ये जा, असे आदेशही देण्यात आले आहेत. - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्प यात्रा जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निघणार आहे.  

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक