शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यानंतरच आघाडीचा पाठिंबा मिळणार; काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 5:39 AM

राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंगळवारी मुंबईत दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत

मुंबई : राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंगळवारी मुंबईत दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. शिवसेना आणि आघाडीत सत्ता वाटपाचे सुत्र ठरल्यानंतरच शिवसेनेला पाठिंबा देण्यावर निर्णय होणार असल्याचे समजते.महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर बैठका झाल्या. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. याच दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी पवारांनी फोनवर चर्चा केली. तर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पवारांनी भेट घेतली.राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीकडे लागले होते. मात्र सांयकाळपर्यंत काँग्रेसचा निर्णयच होऊ शकला नाही; त्यामुळे राष्टÑवादीने आपल्या पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला दिलेच नाही.सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला ७२ तासांचा वेळ दिला होता. मात्र शिवसेनेला फक्त फक्त २४ तासांचा अवधी दिला. शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याने त्यांनी वेळ वाढवून मागितला; पण राज्यपालांनी तो दिला नाही, अशी तक्रार काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे अशी शरद पवार यांची इच्छा आहे. राष्टÑवादीचे १२, काँग्रेसने १२, आणि शिवसेनेने १८ मंत्रीपदे घ्यावीत असा प्रस्ताव शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ठरला होता. तो प्रस्ताव दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांनाही सांगितला गेला. मात्र सत्तेत सहभागी व्हायचे की फक्त बाहेरुन पाठिंबा द्यायचा यावर काँग्रेसचा निर्णय होत नव्हता. बाहेरुन पाठिंबा द्यावा आणि फक्त अध्यक्षपद काँग्रेसने घ्यावे असा मुद्दा पुढे आणला गेला. मात्र त्याला राष्टÑवादी तयार होत नव्हती. दरम्यान, काँग्रेसचे आमदार सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे सत्तेत सहभागी व्हायचे असेल तर काँग्रेसच्या वाट्याला काय मिळेल याची आधी चर्चा केली जाईल असे सांगण्यात आले.काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील गटनेते के. सी. वेणुगोपाल, वरिष्ठ नेते अहमद पटेल हे उद्या मुंबईत येत असून ते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत सत्तावाटपाचे सुत्र आणि किमान समान कार्यक्रम ठरविण्यात येणार असल्याचे समजते.>पाठिंब्याची पत्रे का थांबली?काँग्रेस नेत्यांचे दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. सकाळी महाराष्टÑातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस आमदारांशीही चर्चा केली.बहुसंख्य आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सहमत दर्शविली मात्र पाठिंब्यासाठीच्या अटी आणि शर्थी कोणत्या असाव्यात याचा निर्णय होऊ शकला नाही.शिवाय, काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी व्हायचे की, बाहेरून पाठिंबा द्यायचा, यावरही एकमत होऊ शकले नाही. शरद पवारांशी या संदर्भात चर्चा केल्यानंतर पाठिंब्याचे पत्र द्यायचे की नाही, यावर निर्णय होणार आहे.>आता पुढे काय?१) संख्याबळानुसार पहिल्या क्रमांकावर असलेल्या भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले, तर शिवसेनेला निर्धारित वेळेत संख्याबळाचे गणित जुळविता आले नाही. त्यामुळे आता तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे. तशी विचारणा राज्यपालांनी त्यांच्याकडे केली आहे.२) राष्टÑवादीकडे सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ नाही. त्यामुळे एकतर त्यांना काँग्रेस आणि शिवसेनेचा पाठिंबा मिळवावा लागेल. पण या परिस्थितीत राष्टÑवादीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करावे लागेल. मात्र त्यास शिवसेना तयार होईल का?३) सरकार स्थापन करण्यासंदर्भातील सर्व शक्यता आजमावल्यानंतर राज्यपाल राज्यात राष्टÑपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात.४) राष्टÑपती राजवट लागू झाल्यानंतरहीे सत्ता स्थापनेचा दावा करता येऊ शकतो. असा दावा शिवसेना पुन्हा करणार असेल तर त्यासाठी त्यांना काँग्रेस आणि राष्टÑवादीचा पाठिंबा मिळवावा लागेल.५) शिवसेनेला पांिठंबा देण्याबाबत काँग्रेसने नकार दिला तर राष्टÑपती राजवट कायम राहिल.६) राजकारणात काहीही घडू शकते, या अनुभवानुसार उद्या कदाचित भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात किंवा राष्टÑवादी काँग्रेस भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ शकते. मात्र ही शक्यता फारच धूसर आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस