मुंबई : अॅपलचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या ज्या आयफोन ७ व ७ प्लसचे गेल्या महिन्यात लाँचिग झाले त्याविषयी वापरकर्त्यांना अपेक्षा होत्या. पण आयफोन ७ आणि ७ प्लसकडून या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. अपेक्षित असे कोणतेही नावीन्यपूर्ण, क्रांतीकारी तंत्रज्ञान या दोन्ही फोनमध्ये नसल्याचे मोबाइलधारकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अॅपल कंपनी हे दोन्ही नवीन मोबाईल बाजारातून काढून घेण्याची वा त्यात अपडेट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापैकी कोणताही फोन घेण्याची घाई न करणे योग्य ठरेल. बहुतेक मोबाइल ड्युएल सीम आहेत. पण आयफोन सिंगल सीम आहे. त्यामुळे आयफोन युझर्सना दुसरा फोनही बाळगावा लागेल. संगणकावरुन गाणी, फिल्म, व्हिडीओ आयफोनमध्ये टाकता येत नाही. त्यासाठी आय ट्यून्स सॉफ्टवेअर संगणकावर आवश्यक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>अँड्रॉइड फोनशी आयफोनची तुलना करता, अँड्रॉइड वापरकर्त्यांना जास्त फायदे मिळतात. आधीच्या आयफोनशी तुलना करता ७ मध्ये फारसे काही नवीन नाही. आयफोन ७ मध्ये आयओएस १0 ही सिस्टीम आहे. ती आयओएस ९ ची अपडेटेड व्हर्जन आहे. त्यामुळे मोबाइलला फारसा फायदा होत नाही. आयफोन ७ विकत घेणाऱ्या अनेकांनी सिग्नल ड्रॉप व जीपीएस व्यवस्थित चालत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. गुगल मॅप वापरताना नो सिग्नल आयकॉन दिसत असल्याचीही तक्रार आहे. >एवढा महागडा फोन घेऊनही आपल्याला हवे तसे हेडफोन कनेक्ट करता येणार नाहीत. कारण या फोनमध्ये हेडफोन जॅक काढून टाकलेले आहे. नवा हेडफोन हरवल्यास दुसरा खरेदी करताना भरमसाठ पैसाही खर्च होईल.>आयफोन ७ मध्ये जी नवे फिचर्स आहेत, त्याला अधिक बॅटरी लागते. त्यामुळे भविष्यात बॅटरीची समस्या उद्भवू शकते. आयफोन ७ ची बॅटरी आयफोन ६ च्या तुलनेत एक ते दोन तासच जास्त चालू शकते. आयफोन ७ च्या रॅममध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही, आयफोन ६ एस प्रमाणेच २ जीबी रॅम देण्यात आला आहे.अॅपलने नव्या आयफोन ७ मध्ये वायरलेस इअरपॅडसचा वापर केला आहे. या इअरपॅडसच्या चोरी होण्याची शक्यता अधिक आहे.
आयफोन ७ घेण्यापूर्वी जाणून घ्या तोटे !
By admin | Published: October 19, 2016 7:10 AM