विवेक भुसे- पुणे : दिवाळीनिमित्त एकावर एक फ्री अशी ऑफर त्याला मोबाईलवर आली़. त्याला ती चांगली वाटल्याने त्याने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला़. त्याचा विश्वास संपादन करुन त्याला ऑनलाईनवर पैसे पाठविल्यास घरपोच वस्तू पोचविण्याचा आश्वासन देण्यात आले़. स्वस्तात वस्तू मिळत असल्याच्या आनंदात त्याने सांगितलेल्या खात्यात तातडीने पैसे पाठविले़. घरपोच वस्तू कधी मिळेल याची वाट पाहत राहिला़. पण, दोन तीन दिवसानंतरही त्याला़ ती वस्तू घरपोच न मिळाल्याने त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर तो नंबर बंद झाला होता़. आपली फेस्टिवल ऑफर त्याला चांगलीच महाग पडली होती़. पण आता पश्चाताप करुन काही उपयोग नव्हता़. दिवाळी अगदी जवळ आली आहे़. लोकांचा आता बोनस झाला आहे़. त्याचबरोबर ऑनलाईन कंपन्यांनी भरघोस ऑफर जाहीर केल्या आहेत़. मोठमोठ्या ऑनलाईन कंपन्यांचा मेगा सेल सुरु आहे़. अशात अनेक छोट्या कंपन्यांही त्यात उतरल्या आहेत़. त्याचवेळी काही बनावट कंपन्यांकडून ग्राहकांना ऑफर दिल्या जात आहेत़. त्याचा स्वीकारता करताना अगोदर संबंधित कंपनी ही खरी आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे़. अशा फेस्टिवल सिझनचा गैरफायदा घेऊन लोकांना फसवण्याचा गोरखधंदा सुरु झाला आहे़. त्यात पुण्यासह अनेक शहरांमधील ग्राहक फसलेले आहेत़. पुण्यातील एका महिलेला ऑनलाईन शॉपिंग करताना एका हॅडलुम कंपनीच्या साड्या आवडल्या़. तिने त्या पसंत करुन त्यांनी सांगितलेल्या खात्यात पैसे भरले़. काही दिवस वाट पाहिल्यानंतरही त्यांना साड्या मिळाल्या नाही़. अधिक चौकशी केल्यावर ती कंपनीच बोगस असल्याचे आढळून आले़. आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कंपन्यांच्या मोठमोठ्या जाहिराती आणि त्यांची होणारी उलाढाल़, ते देत़ असलेली भरमसाट ऑफर यामुळे त्यांच्यासारखेच इतरही कंपन्या ऑफर देत असतील, असा समज अनेक ग्राहकांचा होतो़. त्यातून त्यांना डोळे झाकून दिलेली ऑफर खरी असल्याचे वाटते व ते पुढे व्यवहार करतात़. त्याचाच फायदा घेऊन हॅकर्स लोकांची फसवणूक करतात़ .
काय काळजी घ्यावी?* प्रथमत: आपल्याला आलेली ऑफर कोणाकडून आली आहे, याची माहिती करुन घ्या़ संबंधित कंपनी खरी आहे़ याची खात्री करा़. अनेकदा नामसाधम्याचा फायदा घेतला जाऊन मुख्य कंपनीचीच ही कंपनी असल्याचे भासविले जाते़. * आपण जागरुक असलो तरी अनेकदा या ऑफरच अशा असतात की आपण त्यांच्या मोहात पडतो़. * आपल्याला आलेल्या ऑफरबरोबरच एखादी लिंक दिलेली असते़. त्याची खात्री असल्याशिवाय अनोळखी लिंक शक्यतो ओपन करु नका़. * आपण ती लिंक ओपन केली तर त्यात आपली माहिती भरायला सांगितले जाते़. या माहितीचा गैरवापर करुन तुमचे अकाऊंट हॅक केले जाऊ शकते़. त्याच्या सहाय्याने हॅकर्स तुमचे बँक खाते साफ करतात़. तेव्हा अशी कोणतीही माहिती आपण अनोळखी लोकांना शेअर करत नाही ना याची खात्री करा़. * आपण नलाईनवर एखादी वस्तू पसंत केली तर तिची किंमत ऑनलाईनने एखाद्या खात्यात पाठविण्यास सांगितले जाते़ ते नेमके खाते कोणाचे आहे, याची खात्री असल्याशिवाय पैसे पाठवू नका़. * इतके सगळे झाले तरी आपल्याला ऑनलाईन वस्तू खरेदी करायची असेल तर कॅश आॅन डिलिव्हरी हा पर्याय स्वीकारा़ .* जर कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय तेथे नसेल तर आपला स्वस्तात वस्तू मिळविण्याचा मोह विसरुन जा़ कारण, असा पर्याय नसलेल्या साईटवरुन आपली फसवणूक होण्याची सर्वाधिक जास्त शक्यता असते़. ़़़़़़़़़़
दिवाळी, क्रिसमस या सारख्या सणांनिमित्त आलेल्या फरची खात्री केल्याशिवाय खरेदीच्या फंदात पडू नका़. या ऑफरवर दिलेल्या लिंकमधील माहिती भरुन आपली माहिती अनोळखी लोकांना पाठविल्यास त्यातून फसवणूक होण्याची शक्यता असते़. ऑनलाईन खरेदी करता नेहमीच कॅश ऑन डिलिव्हरी या पयार्याचा वापर केल्यास आपण फसवणुकीपासून स्वत:ला वाचवू शकतो़. - जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पुणे