- डॉ. जय देशमुखप्रोस्टेट कॅन्सर (पुरुष जननेंद्रियातील ग्रंथीचा कर्करोग) हा पुरुषांना होतो. इतर कॅन्सरपैकी हा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. हा कॅन्सर हा हळूहळू वाढतो. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या स्थितीत हा पुरुष जननेंद्रियाच्या ग्रंथीपर्यंतच मर्यादित असतो. प्रोस्टेट ग्लॅन्ड काय आहे, आणि त्याचे काम काय आहे?‘प्रोस्टेट’ पुरुषांच्या प्रजनन प्रणालीचा एक भाग असतो. साधारण २० ग्रॅम वजन आणि तीन सेंटिमीटर लांब अक्रोडच्या आकारात ‘प्रोस्टेट’ ब्लॅडरच्या खाली असलेल्या ‘पेल्विस’मध्ये असतो. हा शुक्राणूचे पोषण आणि परिवहनाचे काम करणारे वीर्य तयार करतो. प्रोस्टेट कॅन्सरचे लक्षणे कोणती?सुरुवातीला काही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, अॅडव्हान्स स्टेजमध्ये लघवीत अडथळा येणे, लघवीची गती कमी होणे, वीर्यातून रक्त येणे, हाडे दुखणे, ‘इरेक्टायल डिसफंक्शन’ सारखेही लक्षणे दिसून येतात. निदान कसे केले जाते?सुरुवातीच्या टप्प्यात ‘डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन’ (डीआरई) आणि ‘प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन’ (पीएसए)च्या तपासणीतून आणि नंतर ‘अल्ट्रासाउंड’ आणि ‘प्रोस्टेट बायोप्सी’च्या माध्यमातूनही प्रोस्टेट कॅन्सरचे निदान होते.ग्लीसन स्कोर काय आहे?‘ग्लीसन ग्रेडिंग सिस्टीम’ पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे मूल्यांंकन प्रोस्टेट बायोप्सीच्या नमुन्यातून केले जाते. प्रोस्टेट कॅन्सर उपस्थितीच्या आधारावर ‘ग्लीसन स्कोर’ दिले जाते. जास्त ‘ग्लीसन स्कोर’ चिंतेचा विषय ठरतो. प्रोस्टेट कॅन्सरची अवस्था?प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर तो कुठल्या अवस्थेत आहे, हे कळण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. यात बोन स्कॅन, अल्ट्रासाऊंड सिटी स्कॅन, एमआरआय पेट स्कॅन आदींचा समावेश आहे. प्रोस्टेट कॅन्सरच्या चार अवस्थेतील- पहिली अवस्था-सुरुवातीला जे प्रोस्टेटच्या छोट्या भागात असते, दुसऱ्या अवस्थेत-कॅन्सर वाढलेला असतो, यात प्रोस्टेट ग्लँड दोन्हीकडून प्रभावित झालेल्या असतात. तिसऱ्या अवस्थेत- कॅन्सर प्रोस्टेटच्या बाहेर परंतु जवळच्या पेशींपर्यंत पसरलेला असतो, चौथ्या अवस्थेत-कॅन्सर मूत्राशय किंवा ‘लिम्फ नोड्स, हाडे, फुफ्फुस आणि अन्य अवयवांपर्यंत पसरलेला असतो. प्रोस्टेट वाढण्याचे कारण?जास्त वय, प्रोस्टेट किंवा ब्रेस्ट कॅन्सरची अनुवांशिक्ता व लठ्ठपणा हे प्रोस्टेट वाढण्याचे कारण ठरते. प्रोस्टेट कॅन्सरमध्ये ‘पीएसए’ चाचणीची भूमिका?‘पीएसए’चा सामान्यपेक्षा जास्त स्तर हा प्रोस्टेट कॅन्सर किंवा इन्फेक्शनचे संकेत असू शकतात. काय प्रोस्टेट कॅन्सरसाठी सर्वसाधारण लोकसंख्येला तपासणीचा सल्ला दिला जाऊ शकतो?हा वादाचा विषय आहे. आतापर्यंत झालेल्या अभ्यासात यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. कारण, तपासणीनंतरही प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका कमी झालेला नसतो.रोबोटिक सर्जरी लाभदायक आहे?परंपरागत सर्जरीच्या तुलनेत ‘रोबोटिक प्रोस्टेटेक्टॉमी’मध्ये शल्यचिकित्सकाला सर्जिकल उपकरणे आणखी अचूक पद्धतीने वापरण्याचे स्वातंत्र्य मिळते. यामुळे ही लाभदायक ठरते.प्रोस्टेट कॅन्सरपासून संरक्षण?आरोग्यदायी आहार घेतल्यास प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो. आहारात फळ, भाज्यांचे स्थान असायला हवे. सप्लीमेंटमध्ये पोषक आहाराला प्राथमिकता द्यायला हवी. नियमित व्यायाम व वजनावर नियंत्रण असायला हवे. धूम्रपान-प्रोस्टेट कॅन्सरचा संबंध?धूम्रपान करणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये इतर रुग्णाच्या तुलनेत मृत्यूचा धोका वाढलेला असतो. प्रोस्टेटायटिस आणि प्रोस्टेटिक एबसेस काय आहे?प्रोस्टेट ग्लँड्समध्ये आलेल्या सूजला ‘प्रोस्टेटायटिस म्हटले जाते. ज्यामुळे लघवीत अडथळे येतात. काही प्रकरणात ‘फ्लू’ सारखी लक्षणे दिसतात. मधुमेहाचे रुग्ण आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये सामान्य आहे. ‘प्रोस्टेटिक एबसेस’ ही चिंताजनक स्थिती आहे. जी एक्यूट बॅक्टेरियल प्रोस्टेटायटिस म्हणून वाढते. यात खूप जास्त ताप, लघवीत त्रास होतो व लघवीतून रक्त येते.
जाणून घ्या, प्रोस्टेट कॅन्सर
By admin | Published: March 13, 2017 3:52 AM