ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 25 - पुण्यातील टिंबर मार्केट परिसरातील विजय वल्लभ शाळे मागील घरांना पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दुकाने, लाकडाचे गोडाऊन आणि 35 ते 40 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे समजते. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून कुलिंगचे काम सुरू आहे. घटनेनंतर सिलेंडरचे दोन स्फोट झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टिंबर मार्केट येथील विजय वल्लभ शाळे मागील घरांना पहाटे अचानक आग लागली. यामध्ये आजुबाजुला लाकडाचे गोडाऊन असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. यामध्ये 35 ते 40 घरे, दुकाने आणि गोडाऊन जळून खाक झाले.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले होते. 15 गाड्या आणि चार वॉटर टँकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीच घरं आणि गोदामांचं प्रचंड नुकसान झालं असलं तरी सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. तसंच जीवितहानी झाली नाही.