दोन दिवसांपूर्वी देशात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या आपात्कालिन वापरास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर लवकरच देशभरात लसीकरणाचा कार्यक्रमही राबवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावरून भाजपा नेते आणि प्रवक्त राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यातील सर्व नागरिकांना करोनाची लस मोफत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे."राज्यातील जनतेसाठी मोफत लस उपलब्ध करून देण्यात यावी. कोरोना पॅकेज देणार असल्याचं तुम्ही म्हटलं होतं. परंतु दिलं काहीच नाही. लोकांना कमीतकमी मोफत लस तरी द्या," असं राम कदम म्हणाले. त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. "जगभरात पसरलेल्या कोरोना महासाथीच्या संकटाचा परिणाम भारतावरही झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि विशेषत: महाराष्ट्राला याचा याचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही राज्यात अधिक आहे. राज्यातील नागरिकांना आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागत आहे," असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
"किमान लस तरी मोफत द्या"; राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
By जयदीप दाभोळकर | Published: January 05, 2021 2:04 PM
दोन दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या वापरासाठी केंद्रानं दिली होती परवानगी
ठळक मुद्देमोफत लसीकरणासाठी राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्रसीरम आणि भारत बायोटेकच्या लसींच्या वापरासाठी केंद्रानं दिली आहे परवानगी