बुलडाणा : घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात एलईडी बल्ब देऊन वर्षाला सुमारे १३00 दशलक्ष युनिट वीज बचत करण्याचा चंग महावितरणने बांधला आहे. या योजनेमुळे ग्राहकाच्या वीज बिलात वर्षाकाठी २00 ते ७00 रुपयांची बचत होऊ शकेल. राज्यात १ कोटी ७५ लाख घरगुती ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार असून, डिसेंबर २0१५ पर्यत शासनाला एलईडी बल्ब वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे. या योजनेनुसार प्रत्येक ग्राहकाला ७ वॅट क्षमतेचे २ ते ४ बल्ब देण्याची तरतूद आहे. त्याची किंमत १00 रुपये असेल. महावितरणाच्या एसएमएस, ईमेल किंवा कक्षावर यासाठी नोंदणी करता येऊ शकेल. केंद्र सरकारने वीज बचतीसाठी घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटपाची योजना जाहीर केली असून, राज्याला भेडसावणार्या भारनियमनाच्या समस्येवर ही योजना प्रभावी ठरणार आहे.महाविरणची कार्यालये आणि काही निवडक बिल भरणा केंद्रांवर या बल्ब वाटपासाठी स्टॉल लावले जातील. चालू महिन्याचे भरलेले बिल आणि फोटो आयडी दाखविल्यानंतर ग्राहकाला हे बल्ब दिले जातील. ग्राहकांना एलईडी बल्बसोबत तीन वर्षाची गॅरेन्टीसुद्धा दिली जाणार आहे. या तीन वर्षात तांत्रिक कारणांमुळे बल्ब बंद पडल्यास तो महावितरणकडून मोफत बदलून दिला जाईल.*विजेची बचत करण्याचे उद्दीष्टमहावितरण कंपनी राज्यभरात सुमारे २ कोटी २0 लाख ६६ हजार ३७३ ग्राहकांना वीज पुरविते. यात सुमारे १ कोटी ६२ लाख ६१ हजार ३२0 घरगुती, ३६ लाख ६७ हजार ८८३ कृषी, १५ लाख ६९ हजार 0४३ वाणिज्यिक आणि ४ लाख ४८ हजार ३६६ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. विजेच्या तुटवड्यामुळे सर्वात जास्त फटका घरगुती ग्राहकांना बसतो. त्यामुळेच राज्यातील १ कोटी ६२ लाख घरगुती वीज ग्रहकांना एलईडी बल्ब देऊन, वीज बचतीचे लक्ष्य गाठण्याचा महावितरणचा प्रयत्न राहणार आहे.