शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडीयाच्या अभिनंदनाचा विधानसभेत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 2:12 PM

भारताने रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात ८९ धावांनी विजय मिळवला.

मुंबई - भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी पाकिस्तानचा पराभव करून विजय मिळवला. दुसरीकडे, राज्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. त्यामुळे भारतीय संघाचे अभिनंदन करणारे ठराव आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आला आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेनी हा ठराव मांडला.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला सोमवार पासून मुंबईत सुरुवात झाली आहे. तेरावी विधानसभा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. दुसरीकडे, भारताने रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात ८९ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात विधानसभेत धनंजय मुंडे यांनी भारतीय संघाचा अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. या ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. तसेच पुढील सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा सुद्धा यावेळी देण्यात आले.

 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला. मात्र, धनंजय मुंडे यांनी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर शंका उपस्थित केली. किमान नमुना पद्धतीनं ही आकडेवारी वस्तुस्थितीला धरून आहे की नाही हे व्यापक जनहितार्थ तपासून पहावे, अशी मागणी मुंडे यांनी केली.