शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

आता विधान परिषदेतील ‘मदती’वरून संशयकल्लोळ; राज्यसभेच्या ‘बिघाडी’नंतर मविआचा सावध पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 5:57 AM

राज्यसभा निवडणुकीतील फटक्यानंतर अपक्ष व छोट्या पक्षांना सोबत ठेवण्याची मोठी कसरत महाविकास आघाडीला करावी लागेल. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान आहे.

गौरीशंकर घाळेमुंबई :

राज्यसभा निवडणुकीतील फटक्यानंतर अपक्ष व छोट्या पक्षांना सोबत ठेवण्याची मोठी कसरत महाविकास आघाडीला करावी लागेल. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान आहे. दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी आवश्यक मतांची बेगमी झालेली असली तरी गाफील राहायचे नाही, कोणताही धोका पत्करायचा नाही, असा अत्यंत सावध पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. तर, राज्यसभेतील अपघातामुळे निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणाने काँग्रेसची काळजी वाढवली आहे.

या निवडणुकीत विजयासाठी २७ मतांचा कोटा निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५५ आमदारांचे संख्याबळ असलेल्या शिवसेनेला दोन्ही उमेदवार निवडून आणण्यात अडचण राहणार नाही. तर, राष्ट्रवादीकडे ५३ मते आहेत. त्यातील अनिल देशमुख व नवाब मलिकांच्या मतांबाबत अद्याप साशंकता आहे. मात्र, अपक्ष समर्थकांच्या जोरावर आपले दोन उमेदवार निवडून आणण्यात राष्ट्रवादीला फारशी अडचण येणार नाही. 

शिवसेनेची शोधाशोध0 राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेत चिंतेचे वातावरण आहे. 0 आकड्यांचा खेळ कुठे फिरला, याचा शोध सध्या शिवसेनेच्या गोटात सुरू आहे. 0 शिवसेना समर्थक अपक्षांनी आपली कामगिरी चोख बजावली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे झुकलेल्या अपक्षांबाबत संशयाचे वातावरण आहे.

ताकही फुंकून पिण्याची आवश्यकता : खडसे0 राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला. मात्र, विधान परिषदेला ताकही फुंकून प्यावे लागण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. 0 परिषदेची तयारी करताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी मागच्या पराभवाचा धडा घेऊन रणनीती ठरविण्याचे ठरवले आहे. अपक्षांवर अविश्वास दाखविणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

राऊत यांच्या निशाण्यावर अजित पवार समर्थक0 शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आमदार देवेंद्र भुयार, आमदार संजय शिंदे, आमदार श्यामसुंदर शिंदे, कोल्हे या अपक्ष आमदारांची मते मिळाली नसल्याचा आरोप केला. हे तीनही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. 0 त्यामुळे अपक्षांच्या आडून अजित पवारांना तर लक्ष्य करण्याचा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. बविआच्या तीन आमदारांचीही मते मिळाले नसल्याचे राऊत म्हणाले होते.

काँग्रेसला चिंताराज्यसभा निवडणुकीत फटका बसल्याने महाविकास आघाडीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपली अतिरिक्त मते विशेषत: समर्थक अपक्षांची किती मते काँग्रेसकडे वळवतील, याबाबत शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दुचाकी-तिचाकीचे काय ?काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक असलेल्या छोट्या पक्षांनी दिलेला शब्द पाळला नाही. एमआयएम, समाजवादी पार्टी अशा पक्षांकडून अपेक्षित असलेले एकही मते आले नसल्याचा शिवसेना नेत्यांचा समज आहे.

काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यास काँग्रेसला आणखी १२ ते १५ मतांची बेगमी करावी लागेल. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी