शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

कोल्हापुरात बिबट्याचा थरार

By admin | Published: January 02, 2015 1:06 AM

हल्ल्यात चार जखमी : रुईकर कॉलनी भयकंपित; गर्दी अनावर... बिबट्याच्या जिवावर; चांदोलीकडे नेताना मृत्यू

कोल्हापूर : नववर्षाची पहिली सकाळ शहरातील रुईकर कॉलनी परिसराला भयकंपित करणारी ठरली. सकाळी सातपासून चार तास चक्क रस्त्यावरूनच बिबट्या फिरू लागला. कुणीतरी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यावर लोकांचे लोंढे या परिसराकडे लागले. गर्दी पाहून बिबट्या बिथरला. बंगल्यातून, झुडपातून वाट दिसेल तिकडे धावणाऱ्या बिबट्याला चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर पकडण्यात यश आले. त्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात चारजण जखमी झाले. आज, गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास चार तास चक्क रस्त्यावरून बिबट्याच फिरू लागल्याने लोकांची भीतीने गाळण उडाली. तोपर्यंत कुणीतरी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यावर लोकांचे लोंढे या परिसराकडे लागले. यामुळे बिबट्या बंगल्यातून, झुडपातून वाट दिसेल तिकडे जाऊ लागला मध्येच त्याने एका तरुणावर हल्ला केला. शेवटी उद्योजक अरविंद देशपांडे यांच्या बंगल्यात तो घुसला. त्याला पकडण्यासाठी वनविभागासह कोणत्याच यंत्रणेकडे काहीच साधने नव्हती. त्यामुळे विक्रमनगर, सदर बझारमधील काही तरुण आणि माकडवाला )वसाहतीतील कुचकोरवी समाजाच्या धाडसी तरुणांनी जाळीसह झडप घालून त्याला पकडले. त्यानंतर त्याला वनविभागाच्या गाडीतून चांदोली अभयारण्यात नेले; परंतु तिथेच त्याचा दुपारनंतर मृत्यू झाला. बिबट्याला पाहण्यासाठी आलेल्या गर्दीने मात्र गोंधळ उडविला व त्यामुळे त्याला पकडण्यातही अडचणी आल्या. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करून बघ्यांना पिटाळून लावले.कोल्हापूरच्या पूर्वेकडील बाजूस ‘उच्चभ्रूंची वसाहत’अशी ओळख असलेल्या रुईकर कॉलनीला लागून असलेल्या महाडिक वसाहतीमध्ये पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास महापालिका आरोग्य केंद्राच्या मोकळ्या मैदानात बांधकाम कामगार मारुती होसमणी यांना पहिल्यांदा बिबट्या दिसला. घाबरलेल्या होसमणी यांनी ओरडून इतरांना ही माहिती दिली. सकाळी फिरायला गेलेल्या लोक परस्परांना सावध करीत होते. मुळात कॉलनीत बिबट्या आला आहे यावरच कुणाचा विश्वास बसत नव्हता. शिंदे रेसिडेन्सी, दत्तमंदिरापासून तो सगळीकडे फिरत होता. तोपर्यंत लोकांची गर्दी वाढली. त्यांच्या कलकलाटामुळे बिबट्याने खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. या निवासस्थानासमोरील मोकळ्या जागेत पुन्हा काही तरुणांनी धाडसाने बिबट्याला बांबू, काठ्या, आदींनी मारहाण करीत हुसकावून लावले. हुसकावून लावलेला बिबट्या चवताळला आणि तो दिसेल त्या दिशेने जाऊ लागला. संचार कॉलनीच्या कंपौंडवरून एक फेरी मारल्यानंतर बिबट्याने उद्योजक देशपांडे यांच्या ‘गजेंद्र’ बंगल्यातील बागेत फेरी मारली. तेथून त्याने थेट बंगल्याच्या गेटशेजारी असणाऱ्या पडक्या स्वच्छतागृहात काहीकाळ तळ ठोकला. त्याचदरम्यान सकाळी अरविंद देशपांडे मार्निंग वॉकसाठी गाडी काढत असता त्यांच्या पाठीमागे पत्नी रमा यांना बिबट्या दिसल्या. त्या क्षणी त्यांनी जोराने हाक मारून अरविंद यांना सावध केले. त्यानंतर बिबट्याने थेट बंगल्याच्या पुढील पोर्चमध्ये ठिय्या मारला. त्यातच रुईकर कॉलनीत बिबट्या आल्याचे वृत्त व्हॉटस् अ‍ॅपद्वारे शहरात पसरले. या परिसरात दहा हजारांहून अधिक लोकांची गर्दी उसळली. लोक सहलीला आल्यासारखे कुटुंबासह तिथे आले होते. बिबट्या अंगावर आला तर काय होईल, याची भीती त्यांना नव्हती. या गर्दीमुळे बिबट्या अधिकच बिथरला. देशपांडे यांच्या बंगल्यातील पुढील पोर्चमध्येच तो बसला. या दरम्यान कुचीकोरवी समाजाच्या तरुणांनी बिबट्याला पकडण्यासाठी डुकरे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी आणली. ती जाळी टाकून पकडताना त्याने प्रतिहल्ला केला. त्यात दोघे तरुण जखमी झाले. जाळी टाकून पकडताना तो अधिकच चवताळला. तो कोणत्याही क्षणी झडप घालेल, अशी स्थिती होती. त्यामुळे महापालिका अग्निशमन दलाचे जवान, पोलीस यंत्रणा आणि वनखात्याचे कर्मचारी अधिक सतर्क झाले. बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याकडे काहीच साधने नव्हती. त्यामुळे त्यांचे कर्मचारी हतबल होते. चवताळलेल्या बिबट्या तेथून सुटला असता तर काहीतरी अघटित घडले असते; म्हणून कुचकोरवी समाजातील वीसहून अधिक धाडसी तरुणांनी जाळीसह बिबट्याच्या अंगावर उड्या घेतल्या. त्यामुळे बिबट्याला हलता येईना. जाळीतून त्याला पिंजऱ्यात घालण्यासाठी तासभर कसरत करावी लागली. अकराच्या सुमारास त्याला अखेर जेरबंद करण्यात सर्वांना यश आले. सकाळी सात वाजता सुरू झालेली बिबट्या पकडण्याची ही मोहीम अखेर ११ वाजून ४० वाजता संपली. बिबट्याला जेरबंद करून वनखात्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्याला चांदोलीला नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)मी सकाळी साधारण सव्वासात वाजता नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बंगल्यातून गाडी बाहेर काढत होतो. यादरम्यान गाडीचे दार उघडताना माझ्या पाठीमागे बिबट्या असल्याचे पत्नी रमा हिने मला सावध करण्यासाठी ओरडून सांगितले. त्यामुळे मी सावध झालो. यादरम्यान मी गाडीत बसून पुन्हा मॉर्निंग वॉकसाठी गेलो. मुलगी मुग्धाने मला बंगल्यातील पोर्चमध्ये बिबट्या शिरल्याचे मोबाईलद्वारे सांगितले. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास बिबट्याला जेरबंद केल्यानंतर मी घरात आलो. घरातील बिबट्याने इजा केली नाही. -अरविंद देशपांडे बंगल्यात बिबट्या घुसल्याने मी, मुलगी मुग्धा, तिची कन्या तसेच घरातील कामगार घाबरलो. प्रथम बिबट्याने आमच्या कंपौंडवरून उडी मारत बागेतून फेऱ्या मारल्या. त्याला हुसकावण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण जमले होते. त्यामुळे बिबट्या चवताळला. त्याने फेऱ्या मारीत अनेक वेळा डरकाळ्या फोडल्या. चिथावलेल्या बिबट्याने बंगल्याच्या परिसरात कुठेही लपण्यास जागा मिळत नसल्याने प्रवेशद्वारालगतच्या पोर्चमध्ये मुक्काम ठोकला. त्याला एवढ्या जवळून पाहून आम्ही भयभीत झालो. आम्ही सर्व दारे-खिडक्या बंद करून वरील बेडरूममध्ये बसलो. चार तासांच्या प्रयत्नांनंतर तो सहीसलामत सापडला. हा क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा आहे. - रमा देशपांडेदेशपांडे यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये बिबट्या शांतपणे बसला होता. त्याचवेळी त्याला ट्रॅन्क्युलायझर (भुली)चे इंजेक्शन दिले असते, तर तो शांत झाला असता आणि त्याला पकडण्याचे काम दहा मिनिटांत झाले असते. पण, दुर्दैवाने ते झाले नाही. पकडण्याची चुकीची पद्धती आणि नागरिकांकडून झालेल्या गोंधळामुळे मानसिक धक्का बसल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.- रमण कुलकर्णी, मानद वन्यजीव संरक्षकबिबट्या हा प्राणी माणसाच्या वस्तीलाच धरून राहतो, असे अलीकडील अभ्यासातून पुढे आले आहे. भटकी कुत्री हे त्याचे सगळ्यांत महत्त्वाचे खाद्य आहे. आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा पडून राहतो. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढते आहे. जंगल कमी झाल्याने झुडपांमध्ये तो जिथे आपल्याला कमी त्रास होईल, अशा ठिकाणी बसून राहतो. त्यामुळेच तो नागरी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा घटना वारंवार होत आहेत; परंतु वनविभाग त्याबद्दल फारसा जागरूक नाही. त्यांच्याकडे बिबट्या, गवा विहिरीत पडला अथवा नागरी वस्तीत घुसला तर त्याला कसे पकडायचे याची कोणतीच यंत्रणा व साधनेही नाहीत. अग्निशमन दल जसे सज्ज व प्रशिक्षित असते, तशीच रेस्क्यू टीम वनविभागाकडेही हवी; तरच अशा दुर्घटना टाळता येतील.- संजय करकरेसाहाय्यक संचालक (व्याघ्र प्रकल्प)बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, नागपूर.चौघेजण जखमी...बबट्याला जेरबंद करताना चौघे जखमी झाले. यांतील प्रमोद देसाई (रा. विद्या कॉलनी), संजय दुंडाप्पा कांबळे (रा. चांदणेनगर, रुईकर कॉलनी), शाहूपुरीचे पोलीस कॉन्स्टेबल संताजी शीलवंत चव्हाण यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार केले. रवी माने किरकोळ जखमी झाले.शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्नखासदार धनंजय महाडिक, अप्पर पोलीस निरीक्षक अंकित गोयल, महापालिका अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी आर. के. चिले, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे,‘जीवनमुक्ती’चे अशोक रोकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी धनंजय पाटील, नगरसेवक राजू लाटकर, प्रकाश पाटील, सत्यजित कदम, रामराजे कुपेकर, मिलिंद धोंड, मानद वन्यसंरक्षक रमण कुलकर्णी यांच्यासह संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.बिबट्या परिसरातीलच ?हवेलीसारखे मोठे बंगले, त्यांच्या मोठ्या संरक्षक भिंती अशी रचना असतानादेखील या परिसरात बिबट्याचा वावर अगदी मुक्तपणे सुरू होता. त्याची देहबोली पाहता तो या परिसरातीलच असल्याची शक्यता काहींनी व्यक्ती केली. बाहेरून अचानकपणे याठिकाणी बिबट्या येणे शक्य नसल्याचे काहीजणांकडून बोलले जात होते. त्यामुळे हा बिबट्या या परिसरातच कुणी पाळला आहे की काय? असा सवाल काहींनी उपस्थित केला.अपुरी साधने...रुईकर कॉलनीत आलेल्या वनविभागाच्या पथकाकडे ट्रॅन्क्युलायझर इंजेक्शन आणि गनदेखील नव्हती. जाळ्या आणि अन्य साधने त्यांच्याकडे होती. त्याच्या आधारे त्यांना बिबट्याला पकडण्यासाठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे अन्य युवक, नागरिकांनी आपल्या पद्धतीने त्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.फोन ‘नॉट रिचेबल’सकाळी पकडलेल्या बिबट्याचा चांदोली अभयारण्यात नेताना मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी जशी प्रसारमाध्यमांकडे आली, तसे वनखात्यातील अधिकाऱ्यांचे फोन ‘नॉट रिचेबल’ लागत होते; त्यामुळे बिबट्याच्या मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत नव्हता.