शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कुष्ठरोगींना मिळणार एमसीआरची चप्पल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:13 PM

विशेष प्रकारचा रबर; राज्य शासनाने केली ६० लाखांची तरतूद

दिगांबर जवादे गडचिरोली : पायाची संवेदनशीलता हरविलेल्या कुष्ठरोगींना शासनाकडून एमसीआर (मायक्रो सेल्युलर रबर) या विशेष प्रकारच्या रबराची चप्पल वितरित केली जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने ६० लाख रुपयांची तरतूद केली असून राज्यभरातील १० हजार रुग्णांना ही चप्पल उपलब्ध करून दिली जाणार आहे.राज्यभरात कुष्ठरोगाचे जवळपास २० हजार रुग्ण आहेत. २४ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कुष्ठरोग झाल्यानंतर शरीराच्या त्या भागाची संवेदनशीलता नष्ट होते. त्या ठिकाणी इजा झाल्यास रुग्णाच्या लक्षात येत नाही. साध्या चप्पलचा वापर केल्यास तळपायाच्या विशिष्ट भागावरच शरीराचे वजन राहते. ज्या ठिकाणी वजन पडते, त्याच ठिकाणी कुष्ठरोग झाला असल्यास सततच्या भारामुळे जखम आणखी वाढण्याचा धोका राहतो. पायाचा गँगरिन होण्याची शक्यता असते. त्यामुळे तळपायाला कुष्ठरोग झालेल्या रुग्णांसाठी एमसीआर ही चप्पल वरदान ठरणारी आहे.चपलेच्या मागे पट्टा लाभदायकया चपलेचा तळ अतिशय मऊ असल्याने शरीराचा भार तळपायाच्या विशिष्ट भागावर न पडता पूर्ण भागावर पडतो. त्याचबरोबर या चपलेच्या मागच्या बाजूनेसुद्धा पट्टा दिला असल्याने चप्पल पायातून घसरत नाही.या चपलेचे फायदे कुष्ठरोग रुग्णांना होत आहेत. मात्र ही चप्पल सर्वसाधरण चपलेपेक्षा महाग आहे. त्यामुळे शासनाने स्वत:च चप्पल खरेदी करून त्या कुष्ठरोग कार्यालयाच्या वतीने वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार २०१८-१९ या वर्षासाठी सुमारे २० हजार चप्पल खरेदी केल्या जाणार आहेत. प्रत्येक पात्र रुग्णाला सहा महिन्यांतून एक जोड याप्रमाणे वर्षातून दोन जोड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र