शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

जव्हारकडे तरुणाईची पाठ

By admin | Published: August 02, 2016 3:25 AM

शहरी पर्यटकांपासून दुरावल्याने पर्यटनाच्या दृष्टीने मागासलेल्या जव्हारकडे शासनाचेही दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

जव्हार : मुंबई, ठाणे, वसई आणि नाशिकपासून नजीकच्या अंतरावर असूनही शहरी पर्यटकांपासून दुरावल्याने पर्यटनाच्या दृष्टीने मागासलेल्या जव्हारकडे शासनाचेही दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. हिरडपाडा आणि काळमांडवी हे धबधबे पाहतच राहावे, असे आहेत. त्याशिवाय इतर अनेक धबधब्यांमुळे तरुणाईला सहज भुरळ पडावी, अशी निसर्गाची ओतप्रोत भरून राहिलेली संपदा असतानाही पर्यटकांचा प्रतिसाद हवा तसा न मिळणे खरंतर आत्मपरीक्षणाचा विषय ठरावा.पावसाळ्यातील पर्यटनाला त्यात विशेषकरून शनिवार, रविवार म्हणजे पर्वणीच ठरावी. इकडे एसटीने सहज पोहोचता येणे शक्य आहे. खासगी वाहनांनाही येण्यासाठी चांगले रस्ते असल्याने येथील पावसाळी पर्यटन वाढणे शक्य आहे. येथील रस्त्यांवर ढाबासंस्कृती विकास पावत असल्याने चांगला पाहुणचार मिळतो. पावसाळी वातावरणात चुलीवरचे तिखट जेवण आणि नागलीची (नाचणी) भाकरी म्हणजे आहा... म्हणावे लागेल असाच बेत असतो. पावसाळ्याच्या काळात शहरातील हनुमान व सनसेट पॉइंटवर पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी असते. जव्हार संस्थानचे मानबिंदू असणाऱ्या जयविलास पॅलेसची झालेली दुरवस्था येथील दुर्लक्षित कारभाराचे चित्रण करते. जुना राजवाडा कोसळण्याच्या स्थितीत असून ऐतिहासिक शिरपामाळचीसुद्धा म्हणावी तशी व्यवस्था राखण्यात आलेली नाही.जव्हार शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावर असणाऱ्या हिरडपाडा गावात असणारा धबधबा खूप मोठा व उंचीवरून पडणारा धबधबा आहे. हा धबधबा जास्त प्रचलित नसल्यामुळे धबधब्यापर्यंत जायला पुरेशी चांगली अशी व्यवस्था नाही. मात्र थोडी पायपीट केली तर नयनरम्य असा हिरडपाडा धबधबा आपणाला पाहायला मिळतो. हा धबधबा लेंडी नदीवरून पडतो. वर्षा सहलीकरिता हे एक उत्तम ठिकाण आहे.या ठिकाणांचा विकास झाला तर येथील आदिवासी युवकांना रोजगार मिळेल व पर्यटकांनाही स्वस्त तसेच मुंबई-ठाण्यापासून जवळ असलेली जागा आहे. पर्यटन खाते दुर्लक्ष करीत असल्याने येथे तारांकित दर्जाची हॉटेल्स नसल्याने अनेकदा पर्यटक इंटरनेटवरून टेहळणी करूनच नाक मुरडतात. काळमांडवी पर्यटन समिती धबधब्याच्या विकासासाठी खूप प्रयत्न करताना दिसते. मात्र पर्यटन विकास विभाग उदासीन असल्यामुळे समितीच्या सदस्यांकडून नाराजीचा सूर पाहायला मिळतो. (वार्ताहर)>काळमांडवी धबधबा जव्हार शहरापासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या केळीचापाडा या गावातून ३ किमी अंतरावर आत गेल्यावर आपणाला काळमांडवी धबधब्याचे दर्शन होते. काळशेती नदीवरून धबधबा पडत असल्याने या धबधब्याचे नाव काळमांडवी असे पडले आहे अतिशय सुंदर अशी निसर्गाची कलाकृती बघायला पर्यटक गर्दी करतंना दिसतात. या धबधब्याचे डोह जास्त खोल नसल्याने पर्यटक पाण्यात उतरून एन्जॉय करतात, उन्हाळ्यात धबधब्यापर्यंत जायला काळमांडवी पर्यटन समितीने बैलगाडीची व राहायची व्यवस्था केलेली आहे, तसेच धबधब्यापर्यंत सुरक्षित जायला गाइडही मिळतो. मात्र, पावसाळ्यात मातीचा रस्ता असल्याने सरकता होतो व गावातच वाहने पार्क करावी लागतात.>हिरडपाडा धबधबा विकसित करण्यासाठी रिलिंग व पेव्हरब्लॉक बसवणे, निरीक्षण टॉवर, सौरदिवे बसवणे तसेच धबधबा परिसरातील स्थानिक व शासकीय जागेला फेनसिंग करणे, अशी कामे शासनाकडून मंजूर झाली असून थोड्याच दिवसांत हे काम सुरू होईल. - दर्शन ठाकूर, परिक्षेत्र वनअधिकारी, वन विभाग, (उत्तर जव्हार)कसे याल.? मुंबई - घोडबंदर महामार्गे मस्तान नाक्यावरून विक्रमगडमार्गे जव्हारला येणे शक्य आहे. शिवाय, ठाणे-भिवंडी-वाडा-जव्हार असा १२० किमीचा प्रवास अवघ्या पावणेदोन तासांत जव्हारच्या धबधब्यांपर्यंत पोहोचवितो. नाशिक-जव्हार ५८ किमीचा रस्ता असल्याने नाशिककरांना हे अत्यंत जवळचे पावसाळी पर्यटन असू शकते.