ऑनलाइन लोकमत
पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, दि. 5 - 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सामारोपाच्या कार्यक्रमाकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली. शिवसेना पक्षप्रमुखांसोबतच, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे हेही संमेलनाच्या समारोपास अनुपस्थित होते. कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर वगळता शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली.
भाजपा-राष्ट्रवादीच्या जवळिकीची फारशी चर्चा होऊ नये, यासाठी अधिवेशनाला गैरहजर राहणारे शरद पवार, शिवसेना-भाजपातील राजकीय मतभेदांमुळे मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर येणे टाळणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे अशा उद्घाटन सोहळ्यातील राजकीय अनुपस्थितीनंतर आज (रविवारी) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
मुंबई, ठाण्यासह विविध महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत उद्धव ठाकरे संमेलनाला कसा वेळ देतात आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात कमी पडलेल्या आपल्याच राज्य सरकारचा कसा समाचार घेतात, त्याकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागलं होतं.